लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकलेला लाचखाेर नंदाेरीचा मंडळ अधिकारी प्रशांत बैस अखेर निलंबित

0
468

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकलेला लाचखाेर नंदाेरीचा मंडळ अधिकारी प्रशांत बैस अखेर निलंबित

चंद्रपूर, किरण घाटे (५ मे) : कास्तकारांसह सर्व सामान्य जनतेस वेठीस धरणारा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्या अंतर्गत येणा-या नंदाेरीचा मंडळ अधिकारी प्रशांत बैस यास आज निलंबित केले असल्याचे खात्रीलायक व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे. दरम्यान नंदाेरीचा नियमित मंडळ अधिकारी बैस यांस दि. १ एप्रिल राेजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने य़शस्वीरित्या सापळा रचुन दीड हजार रुपयांची लाच भद्रावती तहसील कार्यालयात स्विकारतांना रंगेहात पकडले हाेते. बैस यांचे कडे नंदाेरी शिवाय चंदनखेडा मंडळ अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार हाेता. त्याच मंडळा अंतर्गत येणा-या चरुर धारापुरे येथील एका शेतजमीन खरेदी विक्री फेरफार प्रकरणात फेरफार प्रमाणित करण्यांसाठी दाेन हजार रुपयाची लाच एका कास्तकारांस बैसने मागितली हाेती. नंतर दीड हजार रुपयात हा समझाेता झाला हाेता. परंतु मंडळ अधिकारी बैस यांना ही रक्कम देण्याची मुळीच इच्छा त्या शेतक-याची नव्हती कास्तकाराने थेट लाचलुचपत कार्यालय गाठुन या मंडळ अधिका-याची तक्रार नाेंदविली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने यशस्वी सापळा रचुन बैस यांना आपल्या जाळ्यात अडकविले हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here