कोरोना काळात शेतकऱ्यांना दिलासा* *६१ लक्ष ७३ हजारांचे क्रॉप लोण वाटप*

0
623

*कोरोना काळात शेतकऱ्यांना वढोली सेवा सहकारी संस्थेचा दिलासा*

*६१ लक्ष ७३ हजारांचे कर्ज वाटप*

गोंडपिपरी( सूरज माडूरवार)

सध्या स्थितीत कोरोना चा प्रादुर्भाव वाढला असून मृतकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे.अशातच राज्यासह केंद्राने लाकडाऊनची घोषणा केली.
कोरोना मुळे शेतकऱ्यांच्या मालाला या वर्षी योग्य भाव न्हवता शेतकऱ्यांच्या हाताला काम देखील नाही त्यामुळे आर्थिक अडचनित शेतकरी असल्याचे दिसत आहे.आता शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतीची मशागत करणे सुरू आहे.अशातच सण २०२०/२१ नियमित कर्ज भरणाऱ्या ७७ शेतकऱ्यांना वढोली सेवा सहकारी व मध्यवर्ती ब्यांकेच्या पुढाकारातून शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता ६१ लक्ष ७७ हजारांचे क्रॉप लोण वाटप करण्यात आले.कोरोना काळात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.यावेळी मध्यवर्ती ब्यांकेचे कर्मचारी,सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here