यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कोविड सेंटरला देण्यात आले टॅब फोन
यंग चांदा ब्रिगेडच्या या उपक्रमामुळे कोरोना बाधित रुग्णांना नातलगांशी साधता येणार व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क

कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आपल्या नातलगांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा या करीता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर येथील कोविड सेंटरला दोन टॅबफोन देण्यात आले. आज हे दोन्ही टॅबफोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमने यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी डॉ. सोनारकर, डॉ. सुरपाम यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, सलीम शेख, विलास सोमलवार, विनोद अंनतवार, राशिद हुसेन, प्रतिक शिवणकर, तसेच महिला आघाडीच्या शहर संघटीका, वंदना हातगावकर यांच्यासह दुर्गा वैरागडे, विमल काटकर, चंदा वैरागडे, वैशाली रामटेके, संगीता कार्लेकर, निता नागोसे, शाईन शेख आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूरात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. असे असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहण प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयासह चंद्रपूर येथील शासकीय कोविड सेंटर येथे उपचार सुरु आहे. मात्र कोविड सेंटर येथील रुग्णांची माहिती त्यांच्या नातलगांपर्यंत पोहचत नसल्याच्या तक्रारी होत्या. यावर तोडगा म्हणून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून रुग्णांच्या नातलगांना व्हिडीओ कॉलद्वारे रुग्णांशी संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करता यावी या करीता कोविड सेंटरला दोन टॅब फोन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यातील एक टॅबफोन हा रुग्णांच्या वार्डात तर दुसरा माहिती कक्षात राहणार आहे. रुग्णांच्या नातलगांनी माहिती कक्षात जावून सदर रुग्णांशी बोलण्याची ईच्छा दर्शविल्यास त्यांना त्यांच्या रुग्णांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधून दिल्या जाणार आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या या मोहिमेमूळे रुग्णांना नातलगांच्या संपर्कात राहणे सोईचे होणार आहे.