चंद्रपूरकरांना वाँईनशाँप व बियरबार सुरु हाेण्यांची प्रतिक्षा? वणीकडे जाणा-या मद्यप्रेमींच्या संख्येत हाेईल घट? 

0
731

चंद्रपूरकरांना वाँईनशाँप व बियरबार सुरु हाेण्यांची प्रतिक्षा? वणीकडे जाणा-या मद्यप्रेमींच्या संख्येत हाेईल घट? 

 

 

चंद्रपूर/ विदर्भ ✍🏻किरण घाटे -: अख्ख्या विदर्भात कामगार जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची आेळख आहे .याच जिल्ह्यात शासनाने दि. १एप्रिल २०१५पासून दारुबंदी केली हाेती .राज्य सरकारने ही दारुबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे .चंद्रपूर शहरातील दारुबंदी झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील परवानाधारक दारुविक्रेत्यांना याच कालावधीत सुगीचे दिवस बघावयास मिळत आहे .

अनेक मद्यप्रेंंमी माजरी व घुग्गुस मार्गे वणीला आपल्या दुचाकी व चार चाकी वाहनांनी जात असे .वणी शहरातील कधीही भरुन न दिसणारे बार याच कालावधीत ग्राहकांच्या गर्दीने फुलुन दिसू लागले आहे .तदवतचं माजरी व घुग्गुस या मार्गावरील दिवस रात्र वर्दळ वाढली असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसते .चंद्रपूर शहरातील बार व वाईनशाँप सुरु हाेण्यांची चंद्रपूरकर आतुरतेने वाट बघत आहे .ही दुकाने सुरु झाल्यानंतर निश्चितच वणी कडे जाणां-या ग्राहकांच्या संख्येंत घट हाेणार आहे. यात मुळीच शंका नाही .सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील बड़े व्यापारी शासनाच्या अधिसुचनेची आतुरतेने वाट बघत आहे .हे मात्र खरे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here