वरूड येथील वयोवृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात

0
656

वरूड तालुका प्रतिनिधी ✍🏻निलेश निंबाळकर मो.📱७७४३९०९५०७

अमरावती / वरूड: यावलकर वाडी, वरुड येथील 85 वर्ष वयाचे शामरावजी राऊत व 80 वर्ष वयाच्या गंगुबाई राऊत या वयोवृद्ध दाम्पत्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे कोरोनाशी लढा दिला व कोरोनावर मात करून सुखरूप घरी परत आले त्या बद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संजय आगरकर, जितेंद्र शेटीये, डॉ. अरविंद बडघरे, रवी आगरकर, प्रमोद आगरकर, महेश काळे, सुरेश राऊत, मोतीराम जिचकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here