कन्नमवार जलाशय अंतर्गत कृष्णनगर ते सोनापूर मायनर पाटबंधारऱ्यांतील गाळ उपसा दुरस्ती करा – श्री. शेषराव कोहळे उपसरपंच यांची मागणी

0
465

कन्नमवार जलाशय अंतर्गत कृष्णनगर ते सोनापूर मायनर पाटबंधारऱ्यांतील गाळ उपसा दुरस्ती करा – श्री. शेषराव कोहळे उपसरपंच यांची मागणी

उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग कार्यालयास निवेदन सादर

सुखसागर झाडे : चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय रेगडी अंतर्गत येणाऱ्या मुख्य कालव्यास जोडलेले कृष्णनगर ते सोनापूर मायनर ला रेगडी जलाशयाचे पाणी सोडल्यानंतर खूप दिवसानंतर शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत असते. शेतकऱ्यांचे शेतपीक हे वेळेस पाणी पुरवठा न झाल्याने करपुन जाते व मोठ्या प्रमाणात शेतपीकाचे नुकसान होते. याचं मुख्य कारण म्हणजे या दोन्ही मायनरचे (पाटाचे) खोलीकरणाचे काम मागील १५ वर्षापासून झालेचं नाही त्यामुळे पाटामध्ये वाहून आलेला गाळ व कचरा संचयन होवून पुर्णपणे पाट बुजलेला आहे. या मायनर अंतर्गत पाणी पुरवठा हा जवळपास ७०० हेक्टर क्षेत्रास होता. शेती हंगामाला सुरवात होण्यापूर्वी दोन्ही मायनर च्या खोलीकरणाचे काम पूर्ण करून शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी. अशी मागणी मा.शाखा अभियंता सिंचाई शाखा चामोर्शी यांच्या कडे समस्त शेतकऱ्यांच्या वतीने उपसरपंच श्री. शेषराव कोहळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here