कोरोनाचा प्रादुर्भाव व नियोजनात अभाव !

0
467

कोरोनाचा प्रादुर्भाव व नियोजनात अभाव !
चंद्रपूर गडचिराेली – विशेष प्रतिनिधी किरण घाटे –विदर्भातील चंद्रपूर- गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील समाज सेविका तथा जेष्ठ लेखिका कुसुमताई अलाम यांनी सध्या जगभर चर्चेत असलेल्या गडचिराेलीतील काेराेनाचा प्रादुर्भाव व नियाेजनात अभाव या बाबत आपले मनाेगत शब्दांकित केले आहे .ते आम्ही खास वाचकांसाठी देत आहाे !
🟢🔸🔴गडचिरोली जिल्ह्यात कोरोनावर मात करण्याचे प्रमाण 92.91% आहे. सक्रिय रुग्ण 5.06 व मृत्यू दर 2.43 % एवढा खाली आला आहे हे जर खरे असेल तर वृत्तपत्रातून वाचल्यानुसार शासकीय स्तरावर गडचिरोली जिल्ह्यास कोरोनाच्या रेड झोन मध्ये कसा समावेश करण्यात आला.गडचिरोली जिल्ह्याचा पाँझिटीव्हीटी रेट राज्याच्या सरासरी पेक्षा अधिक असल्याचे आढळून आले असले तरी कोरोना मुक्त होणार्‍या व मृत्यूदरात घट होण्याची परिस्थिती पाहता दिलासा दायक चित्र दिसत आहे. यासाठी जनतेचे आभार मानले पाहिजेत.तसेच आँनड्यूटी असलेले कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमाने हे साध्य होऊ शकले.वृत्तपत्रांनी जबाबदारीने वेळोवेळी पाँझिटिव्हीटी निर्माण करणा-या बातम्या प्रसिद्ध करुन जनतेत चांगला संदेश दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तज्ञांच्या मुलाखत तसेच विडीओ, कोरोना संदर्भातील पोस्ट यांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे. काढा उकळताना घराघरातून येणार्‍या वासाने एकमेकांना आश्वस्त केले आहे.या काळात अनेक आयुर्वेदाची उपचार पद्धती विकसित झाली.हे आत्मनिर्भर होण्याचे लक्षणे आहेत.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्था आणण्यामागे आत्मनिर्भर भारत हाच हेतू होता. खरा विकास गावातूनच होतो. निर्णय घेण्याची प्रक्रिया जेव्हा ग्रामीण भागातील ग्रामसभेद्वारा होईल तेव्हा ख-या अर्थाने भारत सुदृढ व सक्षम होईल. हा त्यांचा मुलमंत्र वर्तमान काळात कोरोना परिस्थिती वर परिणामकारक होऊ शकतो. गाव आरोग्य, स्वच्छता, पोषण आहार समिती, गाव आपत्ती व पुनर्वसन समिती यांच्या सहकार्याने काम करणे आवश्यक आहे.नर्स,आंगणवाडी सेविका, अनावश्यक, आरोग्य सेवक,प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी, यांची साखळीच कोरोनाच्या साखळीला थांबवू शकते. ग्रामसेवक व सरपंच यांच्या मदतीने सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे फोन नंबर डायरेक्टरी तयार करण्यात यावी.जिल्हा,तालुका स्तरावर समिती करुन तिला जोडून घेतले पाहिजे, बचतगटांना त्यात समाविष्ट करण्यात यावे. कोरोना बाबत आजाराची माहिती, त्याचे प्रशिक्षण,गृहविलगिकरण,कोरोनाग्रस्तांकरिता मानसिक आधारासाठीचे तज्ञांच्या मते उपाय,सामाजिक अंतराचे,मास्क,सँनिटाईजर चे महत्व व त्याचा प्रचार, प्रसार, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा हेतू, या आजाराबाबत संभ्रम, आत्मविश्वास,बाहेरन येणाऱ्या व्यक्तीची नोंद,गावातील गरोदर व स्तनदा माता, यांची नियमित भेट, लहान मुलांसाठी आहार,अन्नधान्य,राशन ची मदत ,गावसमिती कडे आकस्मिक निधीची उपलब्धी, कोरोना रुग्ण संदर्भात वेळोवेळी वैद्यकीय सल्ला, गावातील साफसफाई, नाल्या, मच्छर, मलेरिया याची काळजी समितीचे मार्फत होणे गरजेचे ! गावातील स्थलांतरितांची नोंद,वनोपज गोळा करण्यासाठी या समिती ने नियोजन केले पाहिजे.
कोरोना ही महामारी आहे पण आपले जीवन आपण वाचवू शकतो. साप चावून धास्ती घेतली आणि मरण पावले अशा घटना होतात .सारेच साप विषारी नसतात. कोरोना बाबत सुध्दा काहीसे असेच म्हणावे लागेल. गाफील राहून चालणार नाही.तुर्त एतकेच सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक आभार, असेच जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे .

🔴🔸🟢कुसुम ताई अलाम गडचिरोली महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here