आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत क्रांतीनगरीचा विक्रम

0
371

आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत क्रांतीनगरीचा विक्रम

भारतीय संघासाठी चिमुरच्या विक्रम बंगेरीयाकडून सुवर्णपदकाची कमाई


चिमूर/आशिष गजभिये
येथील धावपट्टू विक्रम बंगेरीया यांची बांगलादेश येथील ढाका येथे २० जानेवारीला पार पडलेल्या आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत बागबंधु शेख मुजीब ढाका मॅरेथॉन २०२३ या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष गटातून (४२किमी) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत प्रथम क्रमांक प्राप्त करून नव्या खिताबावर क्रांतीनगरीचे नाव कोरून सुवर्णपदक प्राप्त केले.त्याच्या या यशाने सद्या चिमूर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

मूळचा क्रांतीनगरी चिमूर चा रहिवाशी असलेला विक्रम हा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे.आजपर्यंत त्याने देशांतर्गत विविध राष्टीय स्पर्धेत त्याने आपली छाप सोडली असून अनेक स्पर्धा आपल्या नावाने केल्या आहेत.यात या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवा खिताब आपल्या नावे करून क्रांतीनगरी चिमूर च्या शिरपेचात नवा मानाचा तुरा रोवला आहे.

विक्रम सद्या भारतीय सैन्य क्रीडा प्रशिक्षण संस्था पुणे येथे कार्यकरत असू असून तो जागतिक दर्जाच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा धावपट्टू म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी तयारी करीत आहे. त्याच्या मातृभूमी या यशाने चिमूरसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.त्याच्या या निवडीने सद्या त्याच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव सूरु आहे.

“माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या मातृभूमी ला व माझ्या गुरुजनाना देतो.माझ्या वरील अपेक्षांचे ओझे आणखी वाढले.आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकविन्याच ध्येय होते ते मी मिळवलं असून ऑलम्पिक मध्ये मला देशाच प्रतिनिधित्व करायचं”
विक्रम बंगेरीया, आंतरराष्ट्रीय धावपट्टू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here