Il आत्मविश्वास ll

0
525

Il आत्मविश्वास ll
राजूरा/चंद्रपूर (विदर्भ), किरण घाटे विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठावरील काव्यकुंजच्या मुख्य संयाेजिका तथा चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा पतंजलीच्या जेष्ठ सदस्या सराेज हिवरे यांनी !!आत्मविश्वास! ! हा लेख शब्दांकित केला आहे .ताे खास आम्ही आज वाचकांसाठी देत आहाे . — आत्मविश्वास —
आपला स्वतः वर विश्वास असणे म्हणजेच आत्मविश्वास होय. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकत आत्मविश्वासात असते. आपल्याला प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे बळ आत्मविश्वासात असते. प्रयत्न, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास या गोष्टीमुळे आपण कोणतीही स्पर्धा किंवा परीक्षेच्या वेळी, तसेच एखाद्या महत्वाच्या कार्यात यश मिळवू शकतो. पण यासोबतच आपल्याला कष्ट आणि प्रयत्न हे सुद्धा करावे लागतात. आपल्या जीवन प्रवासात अनेक प्रकारच्या अडचणी व संकटे येत असतात. पण आत्मविश्वासाने आपण त्यावर मात करीत असतो. कोणत्याही परिस्थितीत आपण निराश किंवा हतबल न होता आपण मोठया धैर्याने त्याला सामोरे जावे. आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन एक एक पाऊल पुढे पुढे टाकावे प्रत्येकाचे जीवनात एक ध्येय असते. ते ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने प्रत्येकाने प्रयत्न करावे.
आपले जीवन हे सुख दुःखाचा अथांग सागर आहे तेव्हा प्रत्येकाने या जीवन सागरातुन आपली नौका यशस्वीपणे चालवून आलेल्या वादळांना तोंड देऊन यशाचा किनारा गाठायला हवा.
मनुष्यात आत्मविश्वास असतो तेव्हाच त्याच्या हातून कोणतंही कठीण कार्य सहजपणे पूर्ण होते. इतकंच काय, पण आपल्या मनातली भीतीही दूर होते. एखाद्या कोणत्याही उच्च पदावर असलेल्या व्यक्तीशी आपण संवाद साधू शकतो.किंवा हजारो लोकांसमोर आपण धीटपणे बोलू शकतो. आजच्या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाच महत्व अनन्यसाधारण आहे. “आत्मबळाच्या गुरुकिल्लीनेच यशाच दार उघडल जात. ”
अंतरी विश्वास असेल तर मनुष्य खुलून काम करतो, मग लोक मला काय म्हणतील?माझी टीका करतील? अशा कोणत्याहीप भीतीला तेथे थारा उरत नाही.हाच आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये निर्माण करण्यामध्ये आईवडिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. मी कोणत्याही कामात यशस्वी होईलच हे त्यांच्या मनावर बिंबवण खुप महत्वाचे असते. स्वतःला ओळखणे आणि सक्षम बनने ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्याला हे जमणार नाही हे वाक्य मनातून काढून टाकायला हवे. आपल्या मुलानी काही केलं तर त्याच कौतुक करून त्याला सतत प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आईवडिलांची असते. आपल्या मुलांमध्ये आपणही काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी हे सातत्याने केल पाहिजे.
एखादी गोष्ट जमली नाही तरी काही हरकत नाही तु पुन्हा प्रयत्न कर आम्ही तुझ्यासोबत आहोत हे मुलांच्या मनावर बीबंवण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मुलं आत्मविश्वास प्राप्त करू शकते. मग आयुष्याच्या कुठल्याही टप्यावर धाडस करायला मुले मागे पुढे पाहत नाही. आंतरिक विश्वास असला की मनुष्य स्वतःमध्ये जाणीवपूर्वक काही सकारात्मक बदल घडवून आणतो. साहस, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न यासारख्या अनेक गुणांनी विश्वास तयार होतो. या विचारातुन आयुष्याप्रति असलेला सकारात्मक दृष्टीकोण आपल्याला ऊर्जा देतो. ही ऊर्जा, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये यावा यासाठी आपणही ऐक तरी पाऊल उचलू या.आणि आपल्या मुलांनाही सांगु या !
या जगात अशा कितीतरी व्यक्ती आहेत काहींना डोळे नाही काहींना पाय नाही काहींना हात नाही काहींना बोलता येत नाही. असे शारीरिक व्यंग असून देखील महत्वाच्या पदावर आपापली जबाबदारी उत्तमरीतीने सांभाळत आहेत. आपल्या उणीवावर चांगल्या प्रकारे मात करून यशस्वी होण्यासाठी आंतरिक विश्वास महत्वपूर्ण भूमिका बजावतो. अन्यथा वर करनी उंची कपडे घालून ज्वेलरी घालून मेकअप करून तुम्ही सुंदर दिसालही..पण तुमच्यकडे आत्मविश्वासाचा अभाव असेल तर कुठलीच गोष्ट तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे केवळ दिसणं आणि आतून असणं हा फरक समजून घेणं फार महत्वाचे आहे.
आणि प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे ते म्हणजे आम्ही गरीब आहे किंवा आमच्याकडे पैसे नाही त्यामुळे आमचे भवितव्य उज्वल होऊ शकणार नाही. असे काही नसते.
जर मोठा खड्डा असेल तर त्यात पाणी जास्त जमा होईल पण आपल्याकडे लहान भांडे असेल तर तेवढेच पाणी आपल्याला मिळेल.
म्हणून आपल्याकडे जेवढं आहे त्यातूनच काहीतरी करण्याची तयारी ठेवायची. आपल्याला माहिती आहे गुरुजींनी वर्गात खूप चांगले शिकवले पण आपल्या क्षमते नुसारच आपल्याला समजणार आहे. शिक्षकांनी किती शिकवलं यापेक्षा आपल्याला किती समजलं हे महत्वाचे आहे.
कर्तृत्ववान स्त्री -पुरुष, समाजसेवक, विचारवंत आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांच कार्य कळत नकळत प्रत्येकाला काही ना काही शिकवंत. यातला ऐक तरी गुण आपल्या अंगी यावा म्हणून आपण प्रयत्न केला तरी बरंच काही घडू शकते. आत्मविश्वास हा प्रत्येकातच आहे. तो चांगल्या प्रकारे प्रकट होण्यासाठी दररोज प्रत्येकाने स्वतःला हे सांगायला हवं,…..
🟠🟢हम होंगे कामयब… हम होंगे कामयब…. हम होंगे कामयब एक दिन… l
” मन मे है विश्वास,…. पुरा है विश्वास…… l🟪🟫
हम होंगे कामयब एक दिन l

🟨🟪- सौं. सरोज वि. हिवरे
काव्यकुंज संयोजिका ,
सहकार नगर रामपूर राजुरा
जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here