मॅजीक बस इंडिया फौंडेशनच्या वतीने पोंभूर्णा येथे कार्यशाळा संपन्न

0
436

मॅजीक बस इंडिया फौंडेशनच्या वतीने पोंभूर्णा येथे कार्यशाळा संपन्न

दिनांक 02 नोव्हेंबर 2020 ला मॅजीक बस इंडिया फौंडेशन संस्था चंद्रपूरचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांचे मार्गदर्शनात व नियंत्रणात स्केल कार्यकमांतर्गत पंचायत समिती पोंभूर्णा येथिल गट शिक्षण अधिकारी श्री बाबुराव मडावी सर यांचे अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा गट साधन केंद्र पोंभूर्णा येथे आयोजित करण्यात आली .प्रमुख पाहुणे म्हणून सोनपुरे सर विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग) उपस्थित होते .
कार्यशाळेचे महत्वाचे उद्देश असे की मॅजीक बस द्वारे 12 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्या माध्यमातून शिक्षण व जीवन कौशल्य विकास करणे असा आहे . हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात राबविल्या जात असून पोंभूर्णा तालुक्यातील शाळांमध्ये नव्याने सुरवात करावयाची असल्याने त्या कार्यक्रमाची रूपरेषा व ओळख म्हणून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेत मॅजीक बसच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती प्रमुख मार्गदर्शक प्रशांत लोखंडे ह्यांनी सविस्तर दिली.
प्रसंगी कार्यशाळेला केंद्रप्रमुख, गट साधन व्यक्ती, विषय तज्ञ उपस्थित होते .
त्याचप्रमाणे कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे, सपना देऊरकर, तालुका समन्वयक हिराचंद रोहणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री प्रशांत लोखंडे ह्यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here