वणी शिवसेना शहर प्रमख यांनी केली वॉर्ड क्र 1 मध्ये निर्जंतुकीकरण….

0
618

वणी शिवसेना शहर प्रमख यांनी केली वॉर्ड क्र 1 मध्ये निर्जंतुकीकरण….
कोरोना काळात स्थानिक प्रशासन कोमात…

सद्या वणी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता शिवसेनेच्या पुढाकाराने वणी शहर प्रमुख,राजू तुराणकर यांनी शहरात स्वच्छता अभियान राबविण्याचे कार्य हाती घेतले आहे, सॅनिटायझर निर्जंतुकीकरण फवारणी असे उपक्रम सुरू करण्यात आले असुन मशिनद्वारे शहरात फवारणी करणे, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन परिसर ,ट्रामा केअर कोविड ,ग्रामीण रुग्णालय परिसर ,पोस्ट कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, गुरुवर्य कॉलनी, मनीष नगर , वॉर्ड क्र 1 या ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे. या उपक्रमात आयडॉल पेस्ट कंट्रोल विभाग प्रमुख मंगल भोंगळे शाखा प्रमुख जनार्दन थेटे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
या कोरोना काळात शिवसेनेने पुढाकार घेतल्याने नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण कोमात असून या महामारीत सत्ताधारी व लोकप्रतिनिधी घरी आराम करत आहे यात तिळमात्र शंका नाही. स्वतःला पुढारी म्हणणारे, वेगवेगळ्या पदावर असणारे, गल्लोगल्ली असणारे पुढारी पदाधिकारी यांना शुभेच्छा देणारे, विविध पक्षाचे पुढारी सर्व कुठे गेले, याचा प्रश्न जनतेला पडला आहे ? हा खूप कठीण प्रसंग असून कोणत्याच सामाजिक संघटना जनतेच्या मदतीला येत नाही आहे. अनेकांचे उदरनिर्वाह बंद असल्याने उपासमारी होत आहे. जे कार्य स्थानिक प्रशासनाने करायला पाहिजे ते अजिबात करत नाही आहे. फक्त राजकारण करणे इतकंच याना कळते अस चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here