गाेंडपिपरी तालुक्यातील पटवारी वर्गांकडे अनेक आँनलाईन फेरफार प्रलंबित? शेतकरी चिंतेत!

0
691

गाेंडपिपरी तालुक्यातील पटवारी वर्गांकडे अनेक आँनलाईन फेरफार प्रलंबित? शेतकरी चिंतेत!

८ दिवसांत फेरफार निकाली निघाले नाही तर आंदोलन उभारु, तहसिलदारांना दिला जनतेंनी इशारा!

गाेंडपिपरी (चंद्रपूर)किरण घाटे⬜काेणत्याही शासकीय किंवा खासगी कामासाठी शेतकरी वर्गांसाठी सातबारा व फेरफार ही फार महत्वाची व आवश्यक बाब आहे .परंतु सातबारा अद्यावत झाला नाही तर शेतक-यांना अनेक संकटाचा सामना करावा लागताे परिणामे बँकेचे कर्ज , खरेदी विक्री व्यवहार ,तसेच इत्तर सातबाराशी संबंधित कामे हाेवू शकत नाही .पूर्वी हस्तलिखित सातबारा व फेरफार पध्दत पटवारी वर्गांकडे हाेती .शासनाने यात परिवर्तन करुन आँनलाईन सातबारा व फेरफार पध्दत अंमलात आणली फेरफार रुजू हाेण्यांसाठी कमीत कमी पंधरा दिवसांचा कालावधी असताे .परंतु अनेक ठिकाणी या नियमाला बगल देण्याचे काम सुरु असुन चंद्रपूर जिल्ह्यातील गाेंडपिपरी तालुक्यात अनेक दिवसांपासून शेकडाें फेरफार प्रलंबित असल्याची सत्य बाब नुकतीच उघडकीस आली आहे .परंतु येथील शेतकरी वर्गांचे व सर्वसामान्य जनतेचे फेरफार का शिल्लक आहे याचे मुख्य कारण गुलदस्त्यात आहे .वास्तविक फेरफार रुजूवात करण्यांचे अधिकार शासनाने तहसिलदार, नायब तहसिलदार , मंडळ अधिकारी यांना दिले असतांना या तालुक्यातील शेकडाें फेरफार का शिल्लक असा सवाल गाेंडपिपरी तालुक्यातील जनतेंनी अधिका-यांना विचारला आहे .शासकीय कामाचा व्याप ही फेरफार न हाेण्यांसाठी संयुक्तिक कारणे नाही .शासनाने शेतक-यांना उत्तम सेवा द्या ! त्यांची कामे वेळेवर करा अश्या सुचना वरिष्ठ अधिका-यांना दिल्या असल्यातरी गाेंडपिपरी तालुक्यात मात्र शेतकरी वर्गांना फेरफारसाठी अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे हे खरे वास्तव आहे .दरमहा प्रत्येक तहसील कार्यालय कडुन वरिष्ठ अधिका-यांकडे फेरफार रुजूवात किती व किती शिल्लक यांची आँकड़े वारी लेखी स्वरुपात कळविल्या जाते . वरिष्ठ अधिकारी वर्गांनी या कडे तेव्हाच काळजी पुर्वक व वेळीच लक्ष पुरविले असते तर शेतक-यांचे शेकडाें फेरफार प्रलंबित राहीले नसते .हे ही तेवढेच सत्य आहे कास्तकांराकडुन (शेतसारा) शासकीय वसूलीचे काम जाेमाने केल्या जाते तर शेतकरी वर्गांचे फेरफार तेवढ्या तातडीने का केल्या जात नाही असा सवालही काहींनी या निमित्ताने विचारला आहे . दरम्यान या प्रलंबित फेरफार प्रकरणाकडे राष्ट्रवादी काँ. किसान सेलचे जिल्हाध्यक्ष जगदिश जुनघरी ,आकाश चाैधरी उल्हास करपे , अरुण वासलवार , कुणाल गायकवाड़ , जयेश कारपेनवार यांनी गाेंडपिंपरीचे तहसीलदार मेश्राम यांची भेट घेवून लक्ष वेधले आहे .येत्या आठ दिवसात प्रलंबित फेरफार निकाली निघुन शेतक-यांना अद्यावत सातबारा मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करु असा इशारा देखिल एका शिष्टमंडळाने निवेदनातुन तहसीलदार यांना दिला असल्याचे व्रूत्त आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here