वडिलांसमोर मुलीला अपमानित करणे अत्यंत घृणास्पद – हंसराज अहिर

0
594

वडिलांसमोर मुलीला अपमानित करणे अत्यंत घृणास्पद – हंसराज अहिर

आशाला न्याय मिळविण्याकरीता अहिर यांचा एल्गार

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

आत्महत्या प्रकरणी क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांना तात्काळ पदावरून हटवून अटक करा

राजुरा, (5 एप्रिल) अमोल राऊत वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालयातील क्षेत्रीय नियोजन अधिकाऱ्याच्या दप्तर दिरंगाई आणि अपमानास्पद वागणुकीने त्रस्त होऊन सास्ती येथील आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय युवतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती. याप्रकरणी एका शिष्टमंडळानी माजी केंद्रीय ग्रूहराज्य मंत्री हंसराज अहिर यांना निवेदन देऊन संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली.यावेळी अहिर यांनी तात्काळ पोलिस अधीक्षक, चंद्रपुर, राजुरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक , वेकोली चे मुख्य महाप्रबंधक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आशा च्या आत्महत्या प्रकरणात कोणत्याही प्रकारची हयगय आणि दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही तसेच वेकोलीच्या त्या क्षेत्रीय नियोजन अधिकार्यांने आपल्या कक्षात बोलून त्या मुलीला परिवारासमोर अपमानित करत अर्वाच्य भाषा वापरणे हा प्रकार अत्यंत घ्रुणास्पद असून सातबारावर आजोबा आणि वडिलांचे नाव असून त्यांनी मुलीला नौकरी करीता संमती दिली असतांना तिच्या आईला आपल्या समक्ष आणण्याचा अट्टाहास त्या वेकोली अधिकार्यांनी का केला. असा सवालही अहिर यांनी उपस्थित केला. म्रूतक परीवाराच्या लेखी तक्रारीची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद व्हावा आणि योग्य तपास करून त्याला अटक करून आशा ला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया अहिर यांनी दिली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे राहील अशी ग्वाही यावेळी अहिर यांनी शिष्टमंडळाला दिली. वेकोली करीता शेतजमिनी मोठ्या प्रमाणात अधिग्रहीत होत असून त्यांना योग्य व वाढीव मोबदला मिळावा तसेच त्यांना वेकोली मधे नौकऱ्या मीळाव्यात यांकरीता मी दिवसरात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी होतो. शिक्षणानुसार नौकरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चंद्रपुर जिल्ह्यातच नौकरी मिळावी हा लढा सुधा आम्ही यशस्वी केला. आशा च्या प्रकरणात झालेला अन्याय अजिबात खपवून घेतला जाणार नाही असेही अहिर म्हणाले.
या प्रकरणात राजुरा पोलीस स्टेशनला पुल्लया यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना क्षेत्रीय नियोजन अधिकारी या पदावरून तात्काळ हटवीन्यात यावे आणि कागदपत्राची माहिती असणारा आणि प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना सहकार्य करीत त्यांना योग्य मार्गदर्शन देणारा अधिकारी पुल्लया यांना हटवुन त्या जागेवर द्यावा अशी सुचना वजा मागणी माजी केंद्रीय ग्रूहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वेकोली प्रशासनाकडे केली आहे.
वेकोलीच्या या अधिकाऱ्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त चांगलेच त्रस्त दिसत असून. त्यांना अनावश्यक कागदपत्र मागणे, त्याची पूर्तता न केल्यास पैशाची मागणी करणे, अरेरावी ने बोलणे, दलालांना जवळ करून प्रकल्पात जमिनी गेलेल्यांना ऑफिसातून अपमानित करीत बाहेर काढणे, असे प्रकार राजरोसपणे सुरु असल्याने या नियोजन अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अहिर यांनी घेतली आहे.
यावेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामधे तुळशीराम घटे, संजय घटे, सुरेश घटे, सुनील उरकुडे , क्रुषि व पशुसंवर्धन सभापती जी.प.चंद्रपुर , भाजपा किसान आघाडीचे जिल्हाअध्यक्ष राजू घरोटे, तेली समाज युवक मंडळाचे कार्याध्यक्ष बादल बेले, भाजयूमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, पुरुषोत्तम गंधारे सह समाजबांधवांची उपस्थिति होती. विशेष म्हणजे त्या वेकोली च्या अधिकाऱ्यावर भादवी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रव्रूत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आता त्याला अटक होईल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here