अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न…

0
225

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न…

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे विविध उपक्रम राबवते, त्यांच्या कल्याणकारी कार्यात महिलांना विशेष प्राधान्य देते. त्याचाच एक भाग म्हणून आज 06 जानेवारी रोजी सुई-धागा या महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन संयुक्ता लेडीज क्लबच्या अध्यक्षा श्रीमती रचना कंसल जी व समिती सदस्यांनी केले तसेच श्रीमती रचना कंसल जी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व महिलांचे मनोबल वाढवले. सी.एस. आर.माणिकगढ यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

यामध्ये गडचांदूर बैलमपूर, मानोली, थुट्रा या गावातील एकूण 15 महिला सहभागी झाल्या होत्या. हे प्रशिक्षण दररोज ३ तास ​​चालणार असून एकूण सहा महिने चालणार आहे. त्यासाठी गडचांदूर येथील अनुभवी प्रशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात, सर्व लाभार्थ्यांना परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच महिलांशी संबंधित अशा प्रशिक्षणाला चालना देण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here