दुर्गापूर येथे चोरबिटी बोगस बियाणे केले जप्त

0
593

दुर्गापूर येथे चोरबिटी बोगस बियाणे केले जप्त

कृषी विभागाची अवैध बियाणे विक्रेत्यावर करडी नजर

सुखसागर झाडे:- चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे बोगस शासन प्रतिबंधित एच.टी.बी.टी.कापूस बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस स्टेशन आष्टी,पोलीस उपनिरीक्षक श्री. जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के.जी.दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकून बोगस बियाणे विक्री करत असलेल्या राहत्या घरी एकूण 104 कापूस पॅकेट जप्ती केले व संबंधित विक्रेत्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांच्या लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन आष्टी येथे काल रात्री.10.00 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात कापूस घेण्यात येणाऱ्या पट्टयात कृषी केंद्राच्या तसेच संशयित गोदामांच्या ठिकाणी तपासण्या सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एच.टी.बी.टी. बियाणे लागवड करू नये, शासन मान्यताप्राप्त वाणांचीच लागवड करावी असे आव्हान कृषी विभागाने केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here