तांडेसामू चालो’ म्हणजे काय…?

0
651

तांडेसामू चालो’ म्हणजे काय…?

तांडयाचा समग्र विकासवाद म्हणजे ‘तांडेसामू चालो’ होय. समग्र तांडा विकासाचा तो एक विचार असून तांडा लोकशिक्षणाचा एक ध्यासपर्व होय. ज्या तांडयात जन्माची नाळ आहे. त्या तांडयाला काळजात पेरणारा सुबीज आहे. तांडा शिक्षीत व्हावा. सक्षम व्हावा. याही पलिकडचा विचार करून तांडा ‘स्मार्ट आणि ग्लोबल’ व्हावा. हा आशावाद नव्या पीढीच्या प्रमस्तीष्कात अपलोड करणारा माॅडर्न तांडयाचा साॅफ्टवेयर म्हणजे ‘तांडेसामू चालो’ होय. तांडयातून शहरात स्थिरावलेल्या समाज घटकांना नोकरी, व्यवसाय सोडून तांडयात येण्याचे किंवा तांडयामधिल तांडयातच रहावे हा अट्टाहास यात अजिबात नाही. किंवा तशी संरचना देखिल या समग्र तांडावादी विचारात नाही. तांडयाला नागरी जीवनाच्या सुखसोयी व उदयमशीलता प्रदान करण्याचा व संविधानिक मूल्यांनी सशक्त करण्याचा स्वप्न म्हणजे ‘तांडेसामू चालो’ होय. या तांडाभिमुख आणि विकसनशील संकल्पनेला, विचाराला साहित्यिक तथा तांडा प्रवर्तक एकनाथ नायक (पवार) यांनी रूजवली. आज या विचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
तांडा विकासाच्या आधुनिक प्रवाहात आणणे. तांडा जीवनात सुधारणा घडवून आणणे. त्याच्या स्थितीचा जवळून अभ्यास करणे. त्याची वेदना, व्यथा निष्ठेने समजून घेणे क्रमप्राप्त आहे. यासाठीं आपल्याला तांडयात जाणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तांडा कळणार नाही.
मी तर याही पुढे म्हणेल, तांडयात राहुन सुद्धा तांडा कळणार नाही. आणि ‘तांडेसामू चालो’ म्हणजे काय ते पण कळणार नाही. कारण तांडेसामू चालो’ हा विचार समजण्यासाठी आधी त्याच्या काळजात तांडा, विचारात तांडा, लेखणित तांडा आणि दृष्टीतही तांडा असावा लागतो. तेंव्हा कुठे ‘तांडेसामू चालो’ चा मतितार्थ समजू शकेल. आज तांडयाला देण्याची गरज आहे. त्याच्या मुलगामी कौशल्याला संधीमध्ये परावर्तीत करण्याची गरज आहे. तांडयात गट पाडण्यासाठी, निव्वळ राजकारणा पुरते किंवा भावनिकतेच्या आधारावरची वसुलीसाठी तांडयात जाणे, हे तांडयासाठी सदैव हानिकारक ठरणारे आहे. नव्या पिढीने, समाजातील प्रज्ञाप्रतिभांनी आणि लोकप्रतिनीधीने तांडयाचे हित आणि अहित कशात आहे, याचे देखिल चिकीत्सा करायला हवे. कारण तांडा हा बंजारा समाजाचा दर्पण आहे. तांडयाला आज महानायक वसंतराव नाईकांच्या दृष्टीतूनच बघावे लागेल. स्मार्ट तांडयाच्या व्हिजनमध्ये प्रत्येकानी आपला सहभाग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपापल्या शक्तीनुसार नोंदवीणे आवश्यक आहे. जो तांड्याचा आहे. ज्याला तांडयाविषयी आस्था आहे. ज्याची मानवी संवेदना अबाधित आहे, त्या सर्वांचा हा तांडेसामू चालो’ अभियान आहे. तांडयाच्या दिशेने पाऊले चालण्याशिवाय काळानुरूप तांडाविकास शक्य नाही. म्हणून विकासाच्या आणि सक्षमीकरणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘तांडेसामू चालो’ क्रमप्राप्त आहे.
स्मार्ट तांडा ग्लोबल तांडा
तांडेसामू चालो अभियान
समन्वय अशोक दि जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here