आ. बंटी भांगडीयांनी केली चिमूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवेसाठी तीन रुग्णवाहिकेची मागणी, जिल्हा परिषेदेला दिले तात्काळ पत्र!

0
543

आ. बंटी भांगडीयांनी केली चिमूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवेसाठी तीन रुग्णवाहिकेची मागणी, जिल्हा परिषेदेला दिले तात्काळ पत्र!

चिमूर (चंद्रपूर), किरण घाटे : महाभयानक कोविड 19 चा प्रादुर्भाव दिवसांगणिक चिमूर विधानसभा क्षेत्रात वाढत आहे. समोर होणारी कोरोना तिसरी लाट प्रतिबंधक उपाय याेजना म्हणून अत्याधुनिक रुग्णवाहिका असणे आवश्यक व गरजेचे असून कोरोना रुग्णांचे अमूल्य प्राण वाचवण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्रात तीन रुग्ण वाहिकेची मागणी चिमूरचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी नुकतीच चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांना दिलेल्या एका पत्रातून केली अाहे. लवकरच रुग्ण वाहिका उपलब्ध होणार असल्याचे चिमूर परिसरात बाेलल्या जात आहे.

या विधानसभा क्षेत्रातील चिमूर व नागभीड येथील जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रात जुन्या व जिर्ण रुग्णवाहिका आहे. परंतु दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य केंद्र असून अतिदक्षता असलेले कोरोना 19 रुग्णांना इतरत्र हलविण्यासाठी नवीन रुग्णवाहिकेची आवश्यता आहे .
जुन्या रुग्णवाहिका मुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांना पत्र देऊन आमदार भांगडीया यांनी मागणी केली आहे .सदरहु चिमूर विधानसभा क्षेत्रात (3 रुग्णवाहिका मागणी केलेल्या त्यात ) चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी , नेरी तर नागभीड तालुक्यातील वाढोना केंद्राचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here