घुग्घुस येथील जनता कॉन्व्हेंट शाळेचा विद्यार्थी महामना बत्तूला ने जिंकले स्वर्ण पदक

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
थोरपुरुष बाबा आमटे व म्यॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. प्रकाश आमटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्रम संस्कार छावनी, सोमनाथ, मूल येथे दिनांक २२ ते २६ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य स्तरीय कराटे स्पर्धा पार पडली.
चंद्रपूर जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करीत जनता कॉन्व्हेंट घुग्घुसच्या वर्ग सातवीत शिकणाऱ्या महामना बत्तूला ने अटीतटीच्या अंतिम सामन्यात यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धेला नमवत स्वर्ण पदक आपल्या जिंकून आपले शाळेचे नाव मोठे केले.
शाळेच्या प्राचार्य सविता येरगुडे यांनी महामनाला मोलाचे मार्गदर्शन केले. महामनाने आपल्या यशाचे श्रेय त्याची आई व माजी शिक्षिका निशा रामटेके, वर्गशिक्षिका प्रीती खुशवाह यांना दिले. शाळेकडून महामनाला भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.