बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांची बारामतीला राज्यव्यापी परिषद

0
346

बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांची बारामतीला राज्यव्यापी परिषद

चंद्रपूर । प्रजा लोकशाही परिषदच्या वतीने बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्या साठी परिषदेचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 /10 /2020 बुधवारला रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता राज्यव्यापी न्याय व ह्क्क परिषद अनुज मंगल कार्यालयात, शारदानगर माळेगाव, बारामती (निरा रोड) येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेला आँल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना अध्यक्ष शब्बीर अंसारी, गोरसेना बंजारा राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, सु राज्य पार्टी अध्यक्ष दशरथ राऊत, श्रावण देवरे, दिनानाथ वाघमारे, प्रतापराव गुरव,चंद्रकांत जाधव, विजय बिरारी, उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ओबीसी निहाय जात गणना करण्यात यावी. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही. महाज्योतीला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. बलुतेदार अलुतेदार आणि भटक्या विमुक्तांसाठी आर्थिक विकास महामंडळाना संस्थेच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा. रोहिणी आयोगाची केंद्र सरकारने अंमलबजावणी करावी. या परिषदे मध्ये बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्तांच्या पुढील दिशा ठरवली जाईल आदी मागण्या मांडण्यात येणार आहे.
या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर, कार्याध्यक्ष माणिक चन्ने, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ राजूरकर, सचिव उमेश नक्षिणे, शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरोजताई चांदेकर, उपाध्यक्ष सुनील कडवे, अविनाश मांडवकर, तालुकाध्यक्ष कवडूजी खोबरकर, सुरज आक्कनपल्लीवार, संघटक प्रशांत पांडे, कृणाल कडवे, राजू कोंडस्कर गजानन दरवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here