शेगांव (कुंड) ग्रामपंचायतचा जिल्हातील पहीला उपक्रम – संपूर्ण जेष्ठ नागरिकांचे “कोरोना लसीकरण”

0
461

शेगांव (कुंड) ग्रामपंचायतचा जिल्हातील पहीला उपक्रम – संपूर्ण जेष्ठ नागरिकांचे “कोरोना लसीकरण”

अनंता वायसे । आज शेगांव ( कुंड) येथील 60 वर्ष व त्यावरील 190 जेष्ठ नागरीकांना ग्रामपंचायत चे वतीने खाजगी प्रवासी बस सुविधा उपलब्ध करून दिली व प्राथमिक आरोग्य केंद्र बुरकोनी येथे नेवून ” कोरोना लसीकरण ” करण्यात आले.
आज शेगावातील सर्व जेष्ठ नागरिकांना “कोरोना लसीकरण” केल्याने लोकां मध्ये असलेला लसीकरणा बाबतचे गैरसमज दूर करून इतरांचा असलेला गैरसमज ही दूर होईल, व नागरीक स्वयंम रित्या लसीकरण करून घेतील, लसीकरणा बाबत पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच ग्रामपंचायत नी 15 वा वित्त आयोगातील आरोग्य उपक्रमाचे तरतुदीतून नागरिकांचा प्रवास खर्च करावा, सर्वांनी शासनाच्या उपक्रमाचा लाभ घेवून कोरोना युद्धात आपला सहभाग नोंदवून जिल्हा प्रशासनाला व आरोग्य प्रशासनाला साथ दयावी असे आवाहन ग्रा. पं. उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्री मधुसूदन हरणे यांनी व ग्राप चे सरपंच श्री राजू नगराळे यांनी केले आहे.
हा उपक्रम ग्रामपंचायतीनी जिपचे मुकाअ श्री ओबांसे साहेब, उपमुकाअ श्री विपुल जाधव, उप विभागीय अधिकारी श्री खंडाईत साहेब, तहसिलदार श्री मुधंडा साहेब पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संघमिञा कोल्हे मॅडम तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुचेवार ( दिघे) मॅडम यांचे मार्गदर्शनात आरोग्य विस्तार अधिकारी श्री जाधव, मंडल अधिकारी श्री निनावे, सचीव कु शंभरकर, तलाठी सौ सारीकाताई आखाडे, ग्राप सदस्य श्री नितीन भगत, विजय किलनाके, सौ संगीताताई आकोटकर, योगीताताई वंजारी, सौ सुषमाताई कांबळे, सौ रेखाताई इरखडे, आशा वर्कर सौ रंजनाताई भोंगाडे, अंगनवाडी सेविका सौ रेखाताई पाटील, सौ पुष्पाताई क्षीरसागर, शितलताई भगत, वैशालीताई इरखडे, आरोग्य विभागाचे डॉ रूईकर, आरोग्य सेवक श्री जोशी अर्जून कांबळे यांनी लसी विषयीची साशंकता दुर करण्यासाठी लोक संपर्क केला, तर लसीकरण करण्यासाठी बुरकोनी आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवीका शारदा जोशी, धनश्री बोधीले, श्वेता जिवने, पाटनकर, वाटगुरे, खोबे, शंकर भलमे, राज कासोर, करपे, चव्हाण, राठोड, स्वाती ताकसांडे, माला खानजोडे, सजंय दाते इत्यादी नी अथक परिश्रम घेतले.
एकाच गावातील 60 वर्षा वरील संपूर्ण जेष्ठ नागरिकांचे लसीकरण होण्याचा हा जिल्हातील पहीला उपक्रम ठरला आहे. असाच उपक्रम इतरही गावात राबविला जाईल, असा आशावाद आरोग्य अधिकारी डॉ रूईकर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री जाधव यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here