कोविड केअर केंद्रात रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही – आमदार होळी

0
610

कोविड केअर केंद्रात रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही – आमदार होळी

सुखसागर झाडे : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथील कोविड केअर सेंटर येथे आज आमदार डॉ. देवराव होळी व जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर तालुका आरोग्य अधिकारी लाईबर नगर पंचायत अधिकारी यांनी सदिच्छा भेट देऊन येथील कोविड केअर केंद्राची पाहणी केली. येथील भरती रुग्ण यांच्या सोबत मुक्तपणे संवाद साधला व येथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी येथील कोरोणा ग्रस्त रुग्णांची सेवा सुश्रुषा व उपचार करतांना निधी उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोविड केअर केंद्रात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुन्हा आधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी आवश्यक अनेक महत्त्वपूर्ण साहित्य संदर्भाचे विषय मांडले यावेळी नगर परिषद चे वतीने काही जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले व आमदार डॉ देवराव होळी यांनी येथे कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही असे सांगितले. परंतु सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा कोविड केंद्रात हेळसांड खपवून घेणार नाही असे स्पष्ट सांगितले आज आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या सोबत गडचिरोली विधानसभा मतदार संघातील विविध कोविड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या असुविधा व नवीन कोविड केअर केंद्र सुरू करण्या बाबत चर्चा केली व तमाम कोरोना ग्रस्त नागरिक यांची सेवा करणारे कोरोणा योद्धा डॉ. बंधू भगिनी यांना समस्त नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान आमदार डॉ देवराव होळी यांनी केले. राज्य सरकारने गडचिरोली जिल्हातील कोविड केअर सेंटर ला आवश्यक तो निधीची तरतूद करावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here