कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी आष्टी ग्रामपंचायतीचा पुढाकार, विलगीकरणाची व्यवस्था करणारी ठरली जिल्ह्यतील पहिली ग्रामपंचायत

0
497

कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी आष्टी ग्रामपंचायतीचा पुढाकार, विलगीकरणाची व्यवस्था करणारी ठरली जिल्ह्यतील पहिली ग्रामपंचायत

जिल्ह्यातील समस्त ग्रामपंचायतीने आष्टी ग्रामपंचायत सारखे विलगीकरण कक्ष तयार करावे – आ. डॉ. देवराव होळी

स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी, बीडीओ, ठाणेदार यांनी भेट देऊन केले कौतुक

सुखसागर झाडे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोनाबधित रुग्णांच्या सेवेसाठी व कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आष्टी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एस. चंद्रा महाविद्यालयात पुरुषांसाठी तर सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात महिलांसाठी स्वतंत्र विलगिकरणाचीची व्यवस्था केली. ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय पसरले असून याचा वाढता प्रसार लक्षात घेता आष्टी ग्रामपंचायतीने विलगिकरण कक्षाची सोय करून स्थानिक नागरिकांना येणारी अडचण दूर केली.
आष्टी परिसरात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गृहवीलगिकरणामुळे कुटूंबातील इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. परंतु विलगिकरणाची सोय तालुक्याचे ठिकाण असलेल्या चामोर्शी (मार्कण्डा देव) येथे असल्याने रुग्णांना अडचण येत होती. ही अडचण लक्षात घेऊन आष्टी ग्रामपंचायतीने विलगिकरणाची स्वतंत्र सोय केल्याने व या रुग्णांची दररोज डॉक्टरच्या देखरेखीखाली रुग्णांची तपासणी होत असल्याने व रुग्णांची प्रकृतीत बिघाड झाल्यास त्यास त्वरित जिल्हा कोविड केंद्रामध्ये नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
अशाप्रकारे विलगिकरणाची सोय करणारी ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली असून या ग्रामपंचायतीच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यतील इतर ग्रामपंचायतीने विलगिकरणाची व्यवस्था केल्यास तालुका व जिल्हा स्तरावरील विलगिकरण कक्षावरील भार हलका होऊ शकतो. रुग्णांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात. असे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी व येथील सरपंच सौ. बेबीताई बुरांडे यांनी सांगितले.
आज आष्टी ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या विलगिकरण केंद्राला स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी, चामोर्शी पंचायत समितीचे बीडीओ, आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राठोड, पोलीस उपनिरीक्षक कांबळे मॅडम यांनी भेट देऊन कौतुक केले. जिल्ह्यतील इतर ग्रामपंचायतीनी आष्टी ग्रामपंचायती चा आदर्श घ्यावा असे आमदार डॉ. होळी यांनी प्रतिपादन केले.
यावेळी आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील सामान्य रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर त्वरित मंजूर करावे जेणेकरून या परिसरातील रुग्णांची सोय होईल व ग्रामीण भागात कोरोना प्रसारास आळा बसेल. यावेळी आष्टी जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली पंदीलवार, पंचायत समितीचे सदस्य आक्रेडिवार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. बेबीताई बुरांडे, उपसरपंच सत्यशील डोर्लीकर, माजी सरपंच व ग्रा.प. सदस्य राकेश बेलसरे, पोलीस पाटील विनोद खांडरे, ग्रा.प. सदस्य कपिल पाल, ग्रा.प. सदस्य संतोष बारापात्रे, ग्रा.प. सदस्य छोटू दुर्गे, युवा नेते प्रकाश बोबाटे, ग्रामसेवक श्री पंधरे, स्थानिक डॉ. नर्स व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here