पुलाच्या बांधकामाकरिता चक्क नदीपात्रातून रेतीची चोरी…

0
515

पुलाच्या बांधकामाकरिता चक्क नदीपात्रातून रेतीची चोरी…

गोंडपिपरी तालुक्यातील तारडा येथील प्रकार, तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष

गोंडपीपरी, सूरज माडूरवार : तालुक्यातील तारडा गावातून एका मोठ्या पुलाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या दोन्ही तालुक्याच्या सीमेवरून अंधारी नदी वाहत असून या नदी वर फार मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे .सदर कामासाठी दोन ते तीन यांत्रिक मशीनद्वारे चक्क नदीपात्रालाच उपसून त्यातून दिवसाढवळ्या रेती चोरण्याचा सपाटा सुरू आहे. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो ब्रास रेती पुलाच्या साइडवर टाकल्या गेली आहे. तर मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे नदीपात्रात उत्खनन करून वाहतुकीसाठी ठेवल्याचे दिसून येत आहे. पूलाच्या बांधकामाकरिता कंत्राटदाराने चक्क नदीपात्रातीलच अवैध रेती चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्याला जोडणारा राज्य मार्ग तालुक्यातील तारडा गावापासून जात आहे सदर काम संथ गतीने चालले आहे. तारडा गावालगत अंधारी नदी वाहत असून या नदीवर एका मोठा पुलाचे बांधकाम चंद्रपुरातील एका ठेकेदारांमार्फत सुरू आहे या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे दहा हजार ब्रास रेती ची आवश्यकता राहणार असल्याचे बोलल्या जात असून ही गरज पूर्ण करण्यासाठी सदर ठेकेदाराने चक्क नदीवरच हल्ला चढविला आहे .त्यांनी नदीकाठावर आपला डेरा मांडला असून दिवसाढवळ्या एक दोन नव्हे तर चक्क तीन यांत्रिक मशीनच्या माध्यमातून नदी पात्राला उपसण्याचा पराक्रम चालविला आहे. हा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून चालला असतांना अजून पर्यंत याची काही एक कल्पना तालुका प्रशासनाला नसेल तर नवलच. यांत्रिक मशीनच्या माध्यमातून जवळपास अर्धे पात्र त्यांनी आताच खोदून काढले आहे पुन्हा याच पात्रातून रेती उत्खनन सुरू असून पात्रात मोठमोठी खड्डे पडली आहेत. दरम्यान बांधकाम व्यवसायिककाशी संबंधित व्यक्तींला याबाबत विचारणा केली असता त्यांनी नदीपात्रातूनच पुलाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्यामुळे आम्ही रेतीचा उपसा केला हा प्रकार आमच्या कामकाजाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगतानाच त्यांनी जनतेला मूर्ख समजण्याची घोडचुक केली आहे. याच पात्रातून उपसा केलेला रेतीचा साठा मोठ्या प्रमाणात बांधकाम साइटवर दिसून आला याबाबत आम्ही सदर रेतीचा वापर करणार नसल्याचे सांगून सुरक्षेसाठी नदीपात्रातील माल इतरत्र हलवल्याचे व्यवसायिका मार्फत स्पष्टीकरण दिल्या जात आहे हा सर्व बनाव असून आपली चूक व केलेली चोरी लपविण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी चोरीच्या मालाचा उपयोगातून राज्यमार्गावरील पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होईल. तोपर्यंत गोंडपिपरी तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी डोळ्याला पट्टी बांधून राहतील की आपल्यातल्या कर्तव्य जबाबदारीची जाणीव ठेवून तालुक्यातील या बोगस प्रकारावर कार्यवाही करून ठेकेदाराला कार्यवाही च्या जाळ्यात तोडतील हा प्रश्नच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here