वंचित बहुजन युवा आघाडीचे विविध मागण्या संदर्भात ग्रा.प. विसापूरला निवेदन सादर!

0
513

वंचित बहुजन युवा आघाडीचे विविध मागण्या संदर्भात ग्रा.प. विसापूरला निवेदन सादर!

विसापूर (चंद्रपूर), किरण घाटे : कोरोना महामारी संदर्भात उपाय योजना करण्याच्या संदर्भात नुकतेच विसापूर ग्रामपंचायत कार्यालयला वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे निवेदन सादर करण्यात आले.
● गावातील कोवीड रुग्णांना चंद्रपूर रुग्णालयात ने-आण करण्यासाठी चार चाकी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी.
● गावातील शाळा व मंगल परिणय सभागृह ताब्यात घेऊन अलागिकरण सेंटर तात्काळ उभारण्यात यावे.
● प्रत्येक वॉर्डातील सदस्यांनी आपला वॉर्ड सॅनिटायझर करावा व वॉर्डातील लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.
● विसापूर गावात लसीकरण केंद्रावर विसापूर गावातील लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
● ज्या जेष्ठ नागरिकांनी पहिला लसीकरणाचा डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस लवकर उपलब्ध करून देण्यात यावा व गावातील जेष्ठ नागरिकांचे पूर्ण लसीकरण करून देण्यात यावे तसेच लसीकरण केंद्रावर कुणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
● गावातील प्रा.आ. केंद्रात RT-PCR टेस्ट करण्यात यावे.
● गावातील नागरिक होम क्वारंटाईन झालेले आहेत त्यांना शासकीय व खाजगी डॉक्टरांनी माफक दरात तपासण्या कराव्या. आदि मागण्या सदर निवेदनात नमुद करण्यात आल्या हाेत्या.
निवेदन सादर करतांना गुंजन वानखेडे, संदीप पुणेकर, स्वप्निल सोनटक्के, आशिष तितरे, सिध्दांत पुणेकर, विशाल कांबळे आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here