आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट ला उपलब्ध करून दिले 27 ऑक्सिजन सिलेंडर

0
572

आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट ला उपलब्ध करून दिले 27 ऑक्सिजन सिलेंडर

हिंगणघाट/प्रतिनिधी : तालुक्यात कोरणा महामारी मुळे दिवसें दिवस रुग्णांची संख्या वाढत असून आज दिनांक 24-04-2021 ला दुपारी 12.00 वाजता SDO कार्यालय हिंगणघाट येथे कोरोनाआढावा संदर्भात मिटिंग मध्ये सिलेंडर बाबत चर्चा झाली असता ऑक्सीजन सिलेंडर आपल्या उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे ऑक्सीजन सिलेंडर कमी पडत आहे असे लक्षात येताच याबाबत मा. तहसीलदार श्रीरामजी मुंधडा साहेब, ठाणेदार मा. संपतजी चव्हाण साहेब, नोडल अधिकारी नायब तहसीलदार डॉ. शकुंतलाताई पाराजे यांच्या विशेष प्रयत्नाने अबरार फारुख हिंगणघाट यांचेकडून उपजिल्हा रुग्णालयाला आज 15 ऑक्सीजन सिलेंडर प्राप्त झाले. असून एक दिवसाच्या अगोदर चा ऑक्सिजन साठा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालया मध्ये उपलब्ध राहणार आहे.
हा साठा संपू नये त्यांचे रुटींग बरोबर राहावे ऑक्सिजन सिलेंडर चा प्रचंड तुटवडा असल्यामुळे हे सर्व औद्योगिक सिलेंडर जमा करून परवा 12 जम्बो ऑक्सीजन सिलेंडर आणि आज 15 जंबो ऑक्सीजन सिलेंडर असे एकूण 27 जंबो ऑक्सीजन सिलेंडर यावेळी आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले. जेणेकरून रुग्णांना ऑक्सिजन साठा नियमित मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले.
हिंगणघाट येथील उद्योजकांना व इतर व्यावसायिकांना आमदार समीरभाऊ कुणावार यांनी विनंती करून त्यांच्याकडून औद्योगिक वापरात येत असलेले जंबो ऑक्सिजन सिलेंडर ची मागणी केली त्यानुसार त्यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट मध्ये सिलेंडर ची जुळवा जुळव करून 27 सिलेंडर जुळवले असून त्यामुळे जनतेला फार मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्सीजन सिलेंडर रोज नेने आणि भरून आणणे हा विषय असल्यामुळे आता या ऑक्सिजन सिलेंडर मुळे त्यांना फार मोठा दिलासा मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here