उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे हिंगणघाट विधानसभेतील लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी घेतली तात्काळ बैठक

0
576

उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे हिंगणघाट विधानसभेतील लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी घेतली तात्काळ बैठक

हिंगणघाट/प्रतिनिधी : लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून वर्धा येथील DHO मा. डॉ. डवले साहेब यांना आमदार समीर कुणावार यांनी सतत पाठपुरावा करून त्यांना हिंगणघाट येथील बैठक घेण्यास विनंती केली. त्यानुसार आज दिनांक 24-04-2021 ला ठीक 12.00 वाजता एस डी ओ कार्यालय हिंगणघाट येथे बैठक संपन्न झाली त्या बैठकीला जिल्हा परिषद चे CO मा. श्री. बडे साहेब, DHO डॉ. डवले साहेब, तहसीलदार श्रीरामजी मुंदडा साहेब, नायब तहसीलदार डॉ. शकुंतलाताई पराजे, BDO संगमित्रा कोल्हे, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. चाचारकर साहेब, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किर्तीताई कुचेवार, ठाणेदार संपतजी चव्हाण साहेब सर्वांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये हिंगणघाट येथील लसीकरण तातडीने होण्याबाबत चर्चा केली आणि यावेळी हिंगणघाट शहराची लोकसंख्या 01लाख 20 हजार पाहता या ठिकाणी दोनच लसीकरण केंद्र सुरू असून याठिकाणी पुन्हा दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली त्यावर चर्चा होऊन आरोग्य विभागाचे मनुष्यबळ लक्षात घेता त्याच प्रमाणे जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीकरणाचा साठा लक्षात घेता त्यांनी एक केंद्र जी बी एम एम हायस्कूल मध्ये सुरू करण्यास मंजुरी दिली असून यासाठी लागणारा स्टॉप त्यांनी घेण्याचे आरोग्य विभागाला सुचविले असून सोमवार पासून हिंगणघाट जी बी एम एम हायस्कूल मध्ये सुद्धा लसीकरणाला सुरुवात होणार आहे लसीकरणाचे डोज हिंगणघाट मध्ये कुठेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही DHO डॉ. डवले साहेब यांनी या बैठकीत सांगितले.
हिंगणघाट शहरात तसेच ग्रामीण भागात जे कोरोण टाईन पेसेंट्स आहे त्या कोरोन टाईन पेशंटला किमान सात दिवसाचे औषधे देण्यात यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली.
कोरोन टाइन असलेल्या प्रत्येक पेशंटला त्यांच्या घरापर्यंत औषधी पोहोचण्याचे काम आरोग्य विभागाने तातडीने करावे जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील लक्षणे वाढणार नाही या प्रकारची मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली व ती मान्य करून औषधी देणे सुरू झाले.
कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची व घरच्या लोकांची प्रोटोकॉल प्रमाणे चाचण्या RTPCR व ANTIGEN टेस्ट व्हावी जेणेकरून पॉझिटिव्ह असलेल्या लोकांची टेस्टिंग होईल त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.
हिंगणघाट येथील नगरपालिका तर्फे शहरासाठी औषधी चा साठा देण्याचे नगर परिषद ने मान्य केले असून शहरांमध्ये जे कोरोन टाईन पेशंट आहे त्यांच्या घरापर्यंत औषधी चा साठा पोहोचवण्याचे काम नगरपरिषद करणार आहे असे मुख्याधिकारी मा. जगताप साहेब यांनी मान्य केले असून औषधी देण्यास सुरुवात झाली आणि औषधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मा. जगताप साहेब यांनी दिली.
तसेच सिंधी रेल्वे येथील PSC ला RTPCR व ANTIGEN टेस्ट सुरू करण्यात यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली त्या मागणीनुसार DHO डॉ. डवले साहेब यांनी सिंधी रेल्वे येथे ANTIGEN टेस्ट उद्यापासून सिंधी रेल्वे PSC येथे सुरु करणार असल्याचे कळविले असून RTPCR टेस्ट सुरू करण्या करिता लवकरच विचार करू असे त्यांनी सांगितले.
कोरोनाला थांबविण्यासाठी लसीकरण हेच एक प्रभावी माध्यम असून जितके जास्त लसीकरण करता येईल तेवढे लसीकरण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि जनतेनी लसीकरण घेतले पाहिजे व शासनाकडून त्यांना लसीकरण देण्यात आले पाहिजे त्यामुळे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळणार आहे.
कोरणा चा वाढता प्रकोप पाहता जनतेने अत्यंत सावध राहणे गरजेचे असून कोरोना चा प्रकोप वाढत असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून अनेकांना ऑक्सीजन बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जनतेला कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये कोव्हिड च्या त्रिसुत्री चे पालन करावे व स्वतःचा जीव वाचवावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here