कोविड विमा लाभापासुन राज्यातील शिक्षक वंचित

0
454

कोविड विमा लाभापासुन राज्यातील शिक्षक वंचित

आज पर्यंत ६८ च्या वर शिक्षकांचा कोरोना सेवा देतांना मृत्यु

Impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती दि.२०एप्रिल : राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च२०२० पासून कोविड १९ अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही पन्नास लाखाचे विमा कवच शासनाने लागू केले आहे. या दरम्यान कोविड सेवेत असतांना मृत झालेल्या शिक्षकांच्या परिवाराला मात्र अद्याप क्लेम मिळाले नाही, अश्या राज्यातील ६८ पीडित शिक्षक परिवारांना त्वरित विम्याचे क्लेम देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यात दिवसाघडीला शिक्षकांच्या मृत्युती संख्या वाढत आहे.
कोविड सेवेत कार्यरत असतांना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे, शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असतांनाशिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र क्लेम मिळाले आहेत हे विशेष. म्हणजे कामाच्या वेळी कामाला लावून मृत्यू झाल्यास पाठ फिरवणे असा प्रकार शिक्षकांबाबत घडतांना दिसून येत आहे. यापैकी कोणालाच ५०लाखाचे विमा क्लेम मिळाले नाही असे त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याबाबत राज्यभरातून ऑनलाइन व जिल्हा शांखान कडुन माहिती मागवलीआहे त्यात सर्वाधिक बाधित १०१ शिक्षक नागपूर जिल्ह्यातील आहेत तर सर्वाधिक १२ मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे झाले आहे. नगर ३,अमरावती २, औरंगाबाद४, बीड १, चंद्रपूर २, गडचिरोली १ गोंदिया ३, जळगाव ८, कोल्हापूर ३,नागपूर ४,नांदेड ४, नंदुरबार ५, नाशिक १, परभणी ३, पुणे ३, सोलापूर ३ ठाणे २, उस्मानाबाद १, वर्धा ३, यवतमाळ ४, रत्नागीरी १ याप्रमाणे जिल्हावार मृत शिक्षकांची संख्या आहे.यात काही जिल्हाची संख्या प्राप्त नाही.संख्येत वाढ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here