शाब्बास डॉक्टर शाब्बास! ३३ गावांचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर तरीही चोख वैद्यकीय सेवा

0
945

शाब्बास डॉक्टर शाब्बास! ३३ गावांचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर तरीही चोख वैद्यकीय सेवा

राजुरा/काढोली (बूज), विर पुणेकर (२० एप्रिल) :
या कोरोना काळाने दहशत वाढवली असून रुग्णालयांवरील हल्लेही वाढले आहेत. डॉक्टरांच्याही काही अडचणी असतात हे समजून घेण्यात समाजमन बरेचदा कमी पडते. आपत्तीच्या लाटा अलीकडे चोहोबाजूंनी धडकू लागल्या आहेत. सरकारी वा खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. ना रेमडिसिव्हिरचा पुरेसा साठा आहे, ना ऑक्सिजनचा. व्हेंटिलेटर्सअभावी अनेकांचे जीव गेले. कित्येक डॉक्टरांना क्षणाची उसंत नाही. झोप नसल्याने डॉक्टरांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. राज्यभरातील चारशे निवासी डॉक्टरांना करोनाची बाधा झाली आहे.
कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांसाठी अपुरी जागा असून गरजेपेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. तसेच डॉक्टरांची सकारात्मक मानसिकता समजून घ्यायला हवी. एका प्राथमिक आरोग्य केन्द्रात ४ वैद्यकीय अधिकारी नेमल्या गेल्या आहे तरी काही ठिकाणी सद्या एक किंवा दोन. असेच काढोली बूज मध्ये घडत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ वैद्यकीय अधिकारी नेमल्या गेले आहे. परंतु त्यात एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना घरीच कोरेन्टीन करण्यात आले असून बाकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित दुय्यम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमण्यात आले आहे. येथे फक्त आता एक म्हणजेच डॉ. विपीन कुमार ओडेला हे कार्यरत आहे. यांच्या प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत ३३ गाव येत असल्या मुळे कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरीही ते स्वतःचे कर्तव्य चिकाटीने बजावत तालुक्यात अव्वल क्रमांकावरती त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.
सध्या ह्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गावोगावी कोरोना संसर्ग तपासणी मोहीम सर्व महाराष्ट्र भर सुरू आहे. त्यात काढोली बूज येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन कुमार ओडेला यांनी तालुक्यात जोमाने आपली कर्तबगारी बजावली आहे. संपुर्ण ३३ गावे कोरोना संसर्ग तपासणी व त्यांच्या वरती योग्य तो उपचार पोहचविण्याचे कार्य ते सतत करीत आहे याचे कौतुक मा. तहसीलदार साहेब यांनी देखील केले आहे.
तरी काही गावकरी यांची अशी तक्रार होती की वैद्यकीय अधिकारी पूर्णता आरोग्य केंद्रात वेळ देत नाही परंतु यामागचे कारण काही वेगळेच आहे. त्यांना कोरोना लसीकरण तसेच गावो गावी जाऊन तपासणी करावयाचे असते. तब्बल ३३ गावांची तपासणी करणे तेही एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हाती हे एका क्षणात किंवा एका हप्त्यात होणे शक्य नाही आणि हे सर्व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार होत असते. म्हणून पूर्णता वेळ आरोग्य केंद्रात देता येत नाही.
असा आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. विवेक पाळणाऱ्या डॉक्टरांना समाजाने शाबासकी द्यायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here