लालनाला प्रकल्प शेतकऱ्यासाठी ठरणार तारणहार

0
436

लालनाला प्रकल्प शेतकऱ्यासाठी ठरणार तारणहार

खडसंगी परिसरातील शेतकऱ्याच्या शेती होणार पाणीदार

आमदार बंटी भांगडीयाचा पुढाकार

आशिष गजभिये
चिमूर

अनेक वर्षांपासून मंजुरी मिळूनही शासनदरबारी बहुप्रतिक्षित असलेला हा प्रकल्प थंडबस्त्यात होता.या बाबत शेतकऱ्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना निवेदन देत समस्या निकाली काढण्याची मागणी केली होती.शेतऱ्यांची समस्या लक्षात घेई आमदार भांगदिया यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सरकारच्या लालफीत शाहित अडकलेल्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मुळे अनेक शेतकऱ्याच्या पिकाला बारामही पाणी उपलब्ध होणार आहे.

तालुक्यातील खडसंगी परिसरातील बोथली, आमडी, खुर्सापार, चिचघाट या परिसरातून लालनाला प्रकल्प होणार असून, याचा फायदा खडसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्याना व्हावा याकरिता चिमुरचे आमदार बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनात खडसंगी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात परिसरातील शेतकऱयांच्या समस्यां आमदार भांगडीया यांनी स्वतः जाणून प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन समस्यांचे निराकरण तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत.
खडसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्याच्या शेती लालनाला प्रकल्पात जाणार असून, यामुळं शेतकऱ्यासाठी लालनाला प्रकल्प तारणहार ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्याच्या शेती पाणीदार होणार असल्याचे मत शेतकऱयांनी दैनिक पुण्यनगरीच्या प्रतिनिधी जवळ सांगितले. ज्या शेतकऱ्याच्या शेतातून हा प्रकल्प जाईल त्याना या जमिनीचा मोबदला मिळणार आहे. याकरिता अनेक शेतकऱ्याच्या सात बाऱ्या मध्ये त्रुटी होत्या. त्या त्रुटी खडसंगी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात तहसीलदार विजय सूर्यवंशी व नागतीलक यांच्या उपस्थितीत शेतकऱ्याच्या सात बारा वरील त्रुटी व शेतकऱ्याच्या असणाऱ्या समस्यांचा निपटारा तात्काळ आमदार बंटी भांगडीया यांनी उपस्थित शासकीय महसूल मंडळाच्या अधिकार्याअंतर्गत सोडवण्यात आले. यावेळी बंटी भांगडीया यांनी सांगितले की, या होणाऱ्या लालनाला प्रकल्पाद्वारे अनेक शेतकऱ्याच्या फायद्याकरिता आपण मोबदला मिळवून देतो आहे. व या लालनाला प्रकल्पामधून अनेक शेतकऱ्याच्या शेती पाणीदार होणार आहेत. त्यामुळं या परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातील सिंचनाच्या सोयी सुटणार आहेत. त्यामुळं अनेक शेतकऱ्याना लालनाला हा तारणहार होणार असल्याचं मत भांगडीया यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य अजहर शेख, तहसीलदार विजय सूर्यवंशी, संजय नागटिळक,जयंत गौरकार, बबलू थुटे, माजी प.स.सभापती राजू झाडे यासह खडसंगी, बोथली, रेंगाबोडी, खुर्सापार, वाहनगाव, आमडी, चिचघाट येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here