नाली बांधकाम कासव गतीने, जनतेला सहन करावा लागतोय नाहक त्रास

0
537

नाली बांधकाम कासव गतीने, जनतेला सहन करावा लागतोय नाहक त्रास

संबधित ठेकेदारावर कारवाही करण्याची जनतेची मागणी

कोरपना, ता.प्र. । तालुक्यातील गडचांदूर नगर परिषद ही सर्वात मोठी असल्याने समस्या सुध्दा मोठ्या प्रमाणावर असते त्या समस्या पैकी एक समस्या म्हणजे नालीची होती म्हणून नगर परिषदेने शहरात विविध भागात बंद नलीचे काम दोन ते तीन महिन्या पासून सुरू असून महात्मा फुले चौक परिसरातील नागरिकांना नलीचे काम पूर्ण न झाल्यामुळे विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

सविस्तर गडचांदर शहरात सध्या बंद नलीचे काम सुरू असून आंबेडकर चौक ते लाल बहादूर शास्त्री शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत बंद नलीचे काम सुरू असून एक ते दीड महिन्यांपूर्वी नाली खोदकाम सुरू केले होते मात्र महात्मा फुले चौक ते लाल बहादूर शास्त्री शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत बंद नलीचे काम अजून पर्यंत पूर्ण झालेले नाही त्यामुळे खोदकाम केलेल्या नालीमध्ये परिसरातील घरांचे सांडपाणी खोदलेल्या नालीमध्ये जमा झाले आहे तसेच नालीलगत एक हात पंप असून त्याचे पाणी ते पाणी सुध्दा तिथेच जमा झाल्याने आणि समोर नाली बंद असल्याने जमा होणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत आहे तर दुसरीकडे खोदकाम केलेल्या नालीलगत आलेल्या हातपंपाचे पाणी आणि लगतच्या घरातील बोरवेलच्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाणी पिणे तर सोडाच पण आंघोळ केली तर शरीराला खाज सुटते आणि अंगावर चट्टे उठतात त्यामुळे परिसरातील नागरिकांनी विचारणा केली असता कंत्राटदार चौधरी आणि त्यांचे संपूर्ण काम पाहणारे मुकादम आशीष वांढरे हे आमची बिल नाही निघाले तर आम्ही कामं कसे करावे अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात अशी परिसरातील महिलांचे म्हणने आहे त्यामुळे परिसरातील महिला आपली आपबिती कथन करण्यासाठी नगर परिषदे मध्ये गेल्या असता नगर परिषदेचे कर्मचारीही आम्हाला बाहेर काढले होते असे महिलांचे म्हणने आहे.

आशिष वांढरे हे आपल्या शहरातील असून सुद्धा त्यांना महात्मा फुले चौक ते लाल बहादूर शास्त्री शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत जे खोदकाम एक ते दीड महिन्यांपूर्वी करून ठेवले आहेत त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत असून खोदकाम केलेल्या नालीमध्ये सांडपाणी जमा झाले आहे त्यामुळे पहिलेच कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे आणि ह्या सांडपाण्यामुळे पांढऱ्या रंगाचे मोठमोठे डास निर्माण झाले असल्याचे सांगितले जाते त्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो असे जनतेचे मत आहे तरी असे कामामध्ये ढसाळ आणि वेळ काढू कंत्राटदार वर नगर परिषद प्रशासनाने यांचे बिल काढण्यात येणार नाही आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुध्दा करावी अशी अपेक्षा महात्मा फुले चौकातील जनतेची रास्त मागणी नगर परिषद प्रशासनाकढे करणार असल्याचे त्यांनी सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here