“आप” बल्लारपुरच्या “जल त्याग धरणा आंदोलनाची” तात्काळ दखल

0
477

 

“आप” बल्लारपुरच्या “जल त्याग धरणा आंदोलनाची” तात्काळ दखल

जीवन प्राधिकरण (MJP) विभागाने शहरातील समस्येवर युद्धपातळीवर काम करण्यास केली सुरुवात

आम आदमी पक्षाने दिनांक 17 जून 2022 ला एक दिवसीय “जल त्याग धरणा आंदोलन” केले व त्या आंदोलना मधून शहरातील जनतेला होत असलेल्या ‘पाण्याच्या समस्या’ बद्दल, प्राधिकरणाच्या त्रुटी युक्त सेवेबद्दल, पाठविल्या जाणाऱ्या भरमसाठ बिलाबद्दल, शहरातील विविध ठिकाणी फुटून असलेल्या पाईप लाईन बद्दल, तसेच मनमानी बिल, स्वच्छ पानी आणि शहरात टाकल्या जात असलेल्या नवीन पाईप लाईन च्या समस्येबद्दल आंदोलना मार्फत (MJP) बल्लारपुर पानी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यां ची कान उघडणी करण्यात आली व समस्येचे निराकरण करण्याबद्दल अंतिम ‘विनंती व चेतावणी’ देण्यात आली.

सदर “आप” बल्लारपुर शहर सयोंजक रविकुमार पुप्पलवार, सह संयोजक अफज़ल अली, महिला संयोजिका अलकताई वेले, महिला सह संयोजिका सलमानताई सिद्दीकी, महिला संघठन मंत्री सरिताताई गुजर यानी एक दिवस “जल त्याग” करून धरणा आंदोनलाला यशस्वी केले, आंदोलन होताच ‘पाणी पुरवठा विभाग बल्लारपूर’ ( MJP) विभागामार्फत ‘आम आदमी पक्षाचा’ मार्फत ज्या-ज्या समस्या सांगण्यात आल्या होत्या त्या-त्या समस्यांचे दखल घेत जीवन प्राधिकरण विभाग हे कामाला लागल्याचे शहरातील विविध भागात दिसून येत आहे व जनतेच्या समस्यांचे निराकरण होत असल्यामुळे जनतेमध्ये “आम आदमी पक्षा” बद्दल मनात विश्वास निर्माण होत असल्याबद्दल चे चित्र जागोजागी दिसून येत आहे व येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये “आम आदमी पक्ष” हा एकच विकल्प असल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here