चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी समीक्षा समितीचा अहवाल शासनाकडे सादर! जनतेचे वेधले निर्णयाकडे लक्ष!

0
540

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी समीक्षा समितीचा अहवाल शासनाकडे सादर! जनतेचे वेधले निर्णयाकडे लक्ष! 🔶चंद्रपूर🟣किरण घाटे🟡🔶चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापुर्वी दारुबंदी झाली .विदर्भातील या अगाेदरच वर्धा व गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी झाली हाेती .कामगार जिल्हा म्हणुन चंद्रपूर जिल्ह्याची आेळख अख्ख्या महाराष्ट्रात आहे .नुकताच एका दारुबंदी समीक्षा समितीने (चंद्रपूर जिल्ह्याचा) आपला अहवाल शासनाकडे पाठविला आहे .त्यामुळे साहजिकचं व्यवसायीक साेबतच जनतेची उत्सुकता शिगेला पाेहचली आहे तरं याच जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील शहरात बाँर व रेस्टाँरंट फलक लागल्याचे द्रूष्टीक्षेपात पडत आहे .ब्लँक गोल्ड सिटी म्हणुन आेळखल्या जाणा-या चंद्रपूर शहरातील चहा टपरी, पानटपरी , , हाँटेल्स , तसेच सलुनच्या दुकाणात दारुबंदी उठविण्यांच्या विविध चर्चा जनतेत रंगु लागल्या आहे .एकंदरीत चर्चा करणां-या नागरिकांची या बाबतीत उत्सुकता शिगेला पाेहचली आहे .दारुबंदी समीक्षा समीतीने शासनाकडे आपला अहवाल सादर केला .या अहवालात नेमके काय नमुद केले आहे .या बाबत फारच गुप्पता बाळगण्यांत आली असुन दारुबंदी राहणार कि उठणार या निर्णयांकडे जिल्हा वासियांचे लक्ष वेधले हे मात्र तेव्हढेच खरे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here