महिला दिना निमित्त सम्मान समारंभाचे आयोजन

0
481

महिला दिना निमित्त सम्मान समारंभाचे आयोजन

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या व तिचे अवचित्त साधून भारत सरकार मान्यताप्राप्त राजकीय विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने शारदा वंजारे श्रावस्ती बहू उद्देशिय संस्था अध्यक्षा यांचा सन्मान क्रांतिज्योती महिला पुरस्कार देऊन करण्यात आला. समाजातील वाईट रूढी परंपरांना नाकारून एक नवा विचार आचार समाजापुढे ठेवणे असामान्य स्त्रीच करू शकते प्रतिगामी विचार प्रवाहाशी दोन हात करत स्वतः सशक्त महिला म्हणून सिद्ध केले. गेले 25 वर्षांपासून सातत्याने समाजकार्य करत आहे. सशक्त भारत निर्माण करण्याकरता आपल्यासारख्या महिलांचे भरीव कार्य आहे. कोरोनाव्हायरस या महामारीच्या संकटात सुद्धा कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता गरजू रुग्णांना सहकार्य केले. आहे म्हणून क्रांतिज्योती महिला पुरस्कार आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विश्वग्रामी पत्रकार संघाच्या वतीने शारदा वंजारे यांना देण्यात आला. या प्रसंगी पद्माकर घायवान जिल्हाध्यक्ष, धर्मपाल माने जिल्हा महासचिव, कुणाल आठवले जिल्हा सचिव, संतोष डोमाळे जिल्हा संपर्कप्रमुख, प्रकाश  वंजारे, निखिल वंजारे आदी उपस्थित होते. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चा विचार जनमानसापर्यंत पोहोचण्याकरता सातत्याने प्रेरणादायी ठरेल असे मत या प्रसंगी बोलताना शारदा वंजारे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here