गडचिराेलीत पार पडला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम !

0
656

गडचिराेलीत पार पडला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम !

🟠🔴🟠गडचिराेली🟠🟠🟡किरण घाटे🔴🟡येथील स्थानिक जयश्री येरमे यांचे लान मधील प्रांगणात दि. 8 मार्च 2021ला नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन यांच्याद्वारे जागतिक महिला दिनाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.सदरहु कार्यक्रमात श्रीमती जयश्री येरमे, रेखा तोडासे, मंगला सलाम, कविता मेश्राम ,विना उईके, मनीषा मडावी, वंदना मडावी, यामिनी मडावी, मृणाल मडावी ,संगीता गोटा, नेहा गेडाम, लक्ष्मी कन्नाके, सुनिता वेटे व नम्रता बोरसे इत्यादी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री येरमे तर प्रमुख पाहुण्या म्हणून मनीषा मडावी, रेखा तोडासे, सुनीता बेटे ह्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन यामिनी मडावी यांनी केले. 🔴🟠🔴🟡🔶🟣🟤🟡🔴🟠🔶 कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी स्त्री शिक्षणाचे महत्व व महिलांचे सबलीकरण याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 🟠🔴🟡🟤🟣🔶🟡🟠🔴🟡🔶याच कार्यक्रमात मिसेस इंडिया गौरव प्राप्त नारी शक्तिच्या पदाधिकारी मनीषा मडावी व कविता मेश्राम यांचा सत्कार करण्यांत आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here