चिमूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
चिमूर/प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर ता.चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने चिमूर येथे दि.8 मार्च 2021 ला जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला.त्या प्रसंगी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. जागतीक महिला दीन निमित्याने महिला सक्षमीकरण.कॅच द रेन या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला वंदना विठले,शैलेजा गायकवाड,वंदना अतकरे,हेमा कडू,मनीषा बनकर, भारती आणदे,वैशाली पडोळे,दुर्गा पोटे,अर्चना लोथे,सविता ठाकरे,पूजा देवतळे, प्राजक्ता काळमेघ,इत्यादी महिला व पुरुष उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वितेसाठी कार्यक्रमाच्या अधक्षा न्यु राष्ट्रीय विद्यालयच्या शिक्षीका सौ.शिल्पा ढाकुनकर तसेच प्रमूख पाहुणे सौ.वंदना पोटदुखे,सौ.शिवानी कुंभारे, श्री.मधुसूदन काळमेघ,श्री.यशवंत लोथें यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा कॉन्व्हेन्ट च्या शिक्षिका सौ.स्मिता राऊत यांनी तर प्रास्ताविक व कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र चंद्रपूर त.चिमूर च्या स्वयंसेविका कू.मयुरी काळमेघ यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.राकेश राऊत यांनी केले.तसेच सौ. वर्षा काळमेघ यांनी प्रेरणादायी गीत म्हणून महिलांना हळदी कुंकू लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..