मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर व कर्मवीर विद्यालय येनबोडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

0
417

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर व कर्मवीर विद्यालय येनबोडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

नागेश नेवारे । मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर जिल्ह्यातील निवळक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे. मॅजिक बस च्या माध्यमातून 12 ते 16 वयोगटातील विद्यार्त्यांसाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम स्केल (SCALE) कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील 2554 विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रम राबवित आहे.
दिनांक 1 मार्च 2021 ला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विज्ञान दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले व प्रोजेक्ट सादरीकरण करण्यात आले त्या मध्ये नैसर्गिक आपत्ती व भूकंप झाल्यानंतर स्वतःचा व इतरांचा कसा बचाव करायचा ह्या विषयी सांगण्यात आले. तसेच स्वच्छता विषयी सांगण्यात आले. विज्ञान युगात असतांना नवनवीन तंत्राचा वापर कश्या प्रकारे करावे हे सांगितले. अशा प्रकारे विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम मॅजिक बस चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे व कर्मवीर विद्यालय येनबोडी मुख्याध्यापक मा. बोधाले सर यांच्या निदर्शनात पार पाडण्यात आला तर या कार्यक्रमात उपस्थित म्हणून मॅजिक बस चे तालुका समन्वयक मा. मनोज टप (क्लस्टर मॅनेजर), मा. प्रतिक दुर्गे ( शाळा सहायक अधिकारी) मा. संदेश चूनारकर ( शाळा सहायक अधिकारी) मा.गोपाल टोंगे (समुदाय संघटक), मा.आकाश सोयाम (समुदाय संघटक), कु. प्रिती नेवारे (समुदाय संघटक), कु. संगिता मोरे (समुदाय संघटक) कर्मवीर शाळेचे मुख्यध्यापक व सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थितीत व यांच्या सहकार्याने विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here