माजी विद्यार्थी महाविद्यालयातील विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते – प्राचार्य अनिल मुसळे
आवाळपूर : विद्यार्थी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तसेच देशाचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी संपर्कात राहिल्यास विविध समाजोपयोगी व महाविद्यालयाचा विकासासाठी कार्यक्रम राहू शकतो. त्यामुळे माजी विद्यार्थी हा सुद्धा महाविद्यालयाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. असे प्रतिपादन त्यांनी गुरुकुल कला, वाणिज्य महाविद्यालय नांदा येथे पार पडलेल्या माजी विद्यार्थी संघटना सोहळ्या दरम्यान व्यक्त केले.

यावेळी प्राचार्य डोंगरे यांनी माजी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन संघटनेचे महत्व विषद केले. तसेच शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती बाबत अधिकची माहिती दिली.
माजी विद्यार्थी संघटना कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य अनिल मुसळे, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य आशिष पईनकर, प्राचार्य राजेश डोंगरे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन कू. मुस्कान पठाण यांनी केले तर आभार माजी विदयार्थी संघटनेचा अध्यक्षा कू. पूनम बलकी यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत पुराणिक, सचिन कर्नेवार, सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, व माजी विद्यार्थी संघटनेचा सदस्यांनी परिश्रम घेतले.