मनपातर्फे गुरुवारी “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरणांची भव्य प्रदर्शनी”

0
512
मनपातर्फे गुरुवारी “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरणांची भव्य प्रदर्शनी”

चंद्रपूर, ता. १५ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने माझी वसुंधरा अभियान २.० व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी  “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरणांची भव्य प्रदर्शनी” आयोजित करण्यात आली आहे.

वाहतुकीतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पेट्रोल-डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. नागरिकाना इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी सोयीचे व्हावे गांधी चौकस्थित चंद्रपूर शहर महानगरपालिका मुख्यालयाशेजारील पार्किंगमध्ये “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरणांची भव्य प्रदर्शनी” भरविण्यात येत आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शनीत ठेवलेल्या सौर उपकरणांच्या स्पॉट बुकिंगवर ‘आकर्षक सूट’ देण्यात आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करून महानगरपालिकेअंतर्गत http://surl.li/ayprp या लिंकवर नोंदणी करणाऱ्या १० भाग्यवान विजेत्यांना ‘लकी ड्रॉ’ द्वारे ‘हेल्मेट’ बक्षिस देण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जनामुळे पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहेत. कमी दुरुस्ती खर्च, चालवण्यास सुलभ, घरी चार्जिंग करणे सोयीचे, कमी खर्चात चार्जिंग, ध्वनी प्रदूषणविरहित आहे. सौरऊर्जा हा ऊर्जेचा नैसर्गिक आणि प्रदूषणरहित स्रोत समजला जाते. त्यामुळे चंद्रपूर मनपा सौर ऊर्जेच्या वापरावर भर देत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्याकरिता सौर उपकरणांची भव्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here