मनपा चंद्रपूर चा लिपिक अडकला एसीबी च्या जाळ्यात

0
133

मनपा चंद्रपूर चा लिपिक अडकला एसीबी च्या जाळ्यात


चंद्रपूर, २३ फेब्रू. : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील तक्रारदार यांना स्वतःचे व स्वतःच्या मुलाच्या नावाने घेतलेले फ्लॅट करावयाचे होते. या फ्लॅट वर स्वतःचे व स्वतःच्या मुलाचे भोगवटदार म्हणून नावाची नोंद करण्यासाठी महानगरपालिका झोन क्रमांक १, संजय गांधी बिल्डिंग चंद्रपूर येथे अर्ज दाखल केला होता. मात्र या विभागात कार्यरत लिपिक फारुख अहमद मुस्ताक अहमद शेख यांनी तक्रारदार (भोगवटदार) यांच्याकडे मालमत्ता नावे चढविण्यासाठी रुपये पंधरा हजारांची मागणी केली.

सदर तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे काल दिली. या आधारे आज सापळा रचून सबंधित लिपिकास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे तसेच चंद्रपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, पोहवा अरुण हटवार, नरेश नन्नावरे, राज नेवारे, ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, पो.अं. वैभव गाडगे, चालक पोशि सतीश सिडाम यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here