घुग्घुसला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे आंदोलन सुरु 

0
513

आजचा ७वा दिवस -अद्याप ताेडगा निघाला नाही ! 

चंद्रपूर – विदर्भ – किरण घाटे विशेष प्रतिनिधी 

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने घुग्घुस येथे विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलन सुरु असुन आज या आंदाेलनाचा ०७वादिवस आहे . ए.सी.सी. कंपनीच्या विरोधात हे आंदोलन सुरु असुन अद्याप या आंदाेलनाकडे ए.सी .सी. प्रशासन किंवा शासनाने लक्ष पुरविले नाही . पि.एफ.चोरी व अन्य रास्त मागण्यांच्या संदर्भात हे आंदोलन पुकारण्यांत आले असल्याचे बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टीच्या एका पदाधिका-याने या प्रतिनिधीस सांगितले . शासन व (ए.सी.सी )प्रशासनाची मिलीभगत असल्याची शंका येत असल्याचे उपरोक्त पार्टीने एका प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे . कामगारांच्या मागण्या ह्या शासनासमोर आणायाच्या आहे जेणे करून या कामगारांवर झालेले शोषन त्यांना प्रत्यक्षात दिसून येईल असे बि.आर.एस.पी जिल्हा महासचिव सुरेशभाऊ पाईकराव यांनी म्हटले आहे . जरं उपराेक्त रास्त मागण्यांची पुर्तता तातडीने न झाल्यास तीव्र आदाेलन छेडण्यांचा इशारा बि .आर.एस .पी.चे जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव

ईश्वर बेले, इरफान पठाण, दीपक दीप, सदानंद ढोरके, शरद पाईकराव, अशोक आसमपल्लीवार, सचिन माहुरे, एकनाथ पाऊनकर, दत्ता वाघमारे, ए .जयाकर, समाधान गायकवाड, ए. जयंत, प्रविण भोयर, शाम कंडे, एस.के.इस्राईल, राजकुमार परमेश, अजय नागपूरे, आदींनी एका प्रसिध्दी पत्रकातुन दिला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here