नांदा – गडचांदूर महसूल विभागात अवैध रेती वाहतुकीचा धंदा फोफावला

0
198

नांदा – गडचांदूर महसूल विभागात अवैध रेती वाहतुकीचा धंदा फोफावला

विना टी.पी. ची रेती साठा करून विक्री जोमात

महसूल अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचा संशय

अवैध रेतीचा शासकीय कामात वापर

गडचांदूर – नांदा फाटा परीसरात अशा प्रकारे ठीक – ठिकाणी साठे करून अवैध रेती वाहतूक केली जात आहे.

नांदा :- तालुक्यात असलेले नदी घाट बंद असल्याने रेती ची मागणी वाढू लागली आहे याचाच फायदा घेत नांदा – गडचांदूर महसूल विभागात अवैध रेती व्यवसायिक सक्रिय झाले असून दुसऱ्या तालुक्यातील रेती हायवा व्दारे टाकून अवैध साठा करून दिवसा ढवळ्या सऱ्हास विकल्या जात असल्याने परिसरात अशा अवैध रेती वाहतुकीचा धंदा चांगलाच फोफावल्याचे दिसून येत आहे.

नांदा फाटा – गडचांदूर महसूल विभागात सिमेंट कारखान्याने भरभराटीस आला असल्याने मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण वाढले आहे. गडचांदूर, नांदा फाटा, कवठाळा, उपरवाही ही गावे वाढतच चालली आहे. त्यामुळे या गावात बारमाही रेतीची मागणी असल्याने रेती व्यवसायिक सक्रिय होवून अवैध रेतीची वाहतूक करताना दिसून येत आहे.

विना टी.पी. अवैध रेती साठा करून विक्री जोमात
तालुक्यात रेती घाट बंद असल्याने अवैध रेती व्यावसायिक दुसऱ्या तालुक्यातून रात्रौ ला विना टी.पी. ची रेती हायवा ने बोलावून आपल्या हद्दीत टाकतात व ती ट्रॅक्टर द्वारे विकल्या जाते. दिवसा ढवळ्या रेती विकल्या जात असली तरी मंडळ अधिकारी व तलाठी डोळेझाक करतांना दिसून येत आहे.

महसूल अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचा संशय
विशेष म्हणजे हे साठे सामान्य जनतेच्या निदर्शनास येत असले तरी मंडळ अधिकारी व तलाठी यांचा निदर्शनास येत नाही का.? की कानाडोळा करतात. यामुळे महसूल अधिकारी व अवैध रेती व्यावसायिक यांच्यात साटे – लोटे असून दर महिन्याला रसद पुरवित असल्याचा विषय जनमानसात चर्चेचा विषय बनला आहे.

अवैध रेतीचा शासकीय कामात वापर
अवैध रेती व्यावसायिक हे ठेकेदार यांना रेती पुरवीत असल्याने हिच अवैध रेती रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, टाकी बांधकाम अशा विविध शसाकिय कामात देखील वापर होताना दिसून येत आहे.

“तलाठी यांचे कडून होत असलेल्या अवैध रेती साठ्याची सविस्तर माहिती घेऊन पुढील करवाई करण्यात येईल.” किशोर उईके, मंडळ अधिकारी, नांदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here