महसुल विभागाची कारवाई ; वाहन चालक रेती घाटावरुन टँक्टर साेडुन पळाला!

0
422

महसुल विभागाची कारवाई ; वाहन चालक रेती घाटावरुन टँक्टर साेडुन पळाला!

अंधारी नदीवरील घटना!

किरण घाटे

सध्या महसुल विभागाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध रेती वाहनांवर दिवसरात्र कारवाई करण्यांची माेहीम उघडली असुन अधुन मधुन कारवाया सुरु झाल्या असल्याचे द्रूष्टीक्षेपात पडुन येते .चंद्रपूर जिल्ह्यातील एकंदर १५तालुक्यात खनिकर्म अधिकारी ,उपविभागीय अधिकारी, तहसिलदार , नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , महसुल विभागाचे विशेष गाेैण खनिज पथक व पटवारी वर्ग अवैध गाैण खनिजावर अंकुश लावण्यासाठी तथा अवैध रेती वाहने जप्त करण्यांकरीता कार्यरत झाले आहे. दरम्यान याच चंद्रपूर जिल्ह्यात तिनशे पेक्षा अधिक अवैध रेती वाहनांवर कारवाई झाल्याचे ऐैकिवात आहे. चंद्रपूर समिपच्या चिचपल्ली येथील अंधारी नदीवर अवैध रित्या रेती नेणा-या एका टैक्टरला रामनगर पाेलिस स्टेशन अंतर्गत येणा-या पाेलिस दुरक्षेत्र चिचपल्लीला नुकतेच जमा करण्यांत आले असल्याचे व्रूत्त आहे .मात्र या घटनेतील टँक्टर चालक व काही हमाल घटनास्थळी वाहन साेडुन पळण्यांत यशस्वि झाले असल्याचे मंडळ अधिकारी आवारी यांनी या प्रतिनिधिस आज सांगितले.
सदरहु कारवाई चंद्रपूरचे विद्यमान तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक तहसिल कार्यलयाचे नायब तहसीलदार जितेन्द्र गादेवार तथा रमेश आवारी यांनी केली आहे. या जिल्ह्यातील अवैध गाैण खनिज संदर्भात महसुल पथकांच्या वाढत्या कारवायांमुळे अवैध रेती तस्कारांचे अक्षरशा धाबे दणाणले हे मात्र खरे आहे. चंद्रपूर तालुक्यात तहसीलदार निलेश गाैंड व त्यांचे महसुल पथक हे अवैध रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी तथा सदरहु वाहने जप्त करण्यांसाठी प्रयत्नशिल झाल्याचे प्रत्यक्षात दिसुन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here