राष्ट्रीय एकता शिबिरासाठी महाराष्ट्राचा संघ पटना (बिहार) ला रवाना

0
208

राष्ट्रीय एकता शिबिरासाठी महाराष्ट्राचा संघ पटना (बिहार) ला रवाना
युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार तथा राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय पटना, बिहार यांच्या संयुक्त विद्यमाने बिरला इन्स्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी मेसरा, पटना कॅम्पस येथे दिनांक 2 डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत होऊ घातलेल्या राष्ट्रीय एकता शिबिरात महाराष्ट्र राज्याचा ५ मुले, ५ मुली आणि १ कार्यक्रम अधिकारी असा गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांचा संघ सहभागी होणार आहे.
या संघाचे संघनायक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की तसेच या संघात श्री शिवाजी महाविद्यालयाचे पवन चिंतलवार, काशीश रोहणे, स्नेहा येरगुडे, तसेच विद्यापीठाअतर्गत इतर महाविद्यालयातील गौरव झाडे, ओम पिपरे, अनुराज चांदेकर, मयुर देशमुख, कु. भाग्यश्री बोभाटे, प्रियंका ठाकरे, शालिनी निर्मलकर, इ. राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होत आहे.
या सात दिवशीय शिबिरात महाराष्ट्र राज्यातील विविधांगी संस्कृतीचे प्रदर्शन शिबिरात सहभागी होत असलेल्या इतर राज्यातील स्वयंसेवकासमोर करणार आहे.
संपूर्ण भारतातील विविध राज्याच्या संस्कृतीचे आदानप्रदान व्हावे, त्यातून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या उद्देशाने शिबिराचे आयोजन बिरला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नौलोजी मेसरा येथे करण्यात येत आहे.
राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय, पुणे (महाराष्ट्र व गोवा) चे क्षेत्रीय निदेशक अजय शिंदे तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ सहभागी होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here