वीज बिलाच्या मुद्दयावर चिमूर – नागभीड येथील विद्युत भवनावर आम आदमी पार्टी चे तालाठोक आंदोलन यशस्वी

0
482

वीज बिलाच्या मुद्दयावर चिमूर – नागभीड येथील विद्युत भवनावर आम आदमी पार्टी चे तालाठोक आंदोलन यशस्वी

प्रमोद राऊत

राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत विज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३०% दर कपातीचे आश्वासन पूर्ण करण्याचे निर्णय घेण्यात यावेत या मागणीसाठी आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर व नागभीड येथील वीज कार्यालयांना दि. १० सप्टेंबर २०२० ला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून राज्यातील जनतेची कोविड-१९ दरम्यानची परिस्थिती फारच बिकट असल्यामुळे वाढीव दराने जास्तीचे वीज देयके देण्यात आलीत, ती रद्द करून २०० युनिट वीजबिल माफ करावे आणि दिलेलेल आश्वासन पाळावे अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे वारंवार करण्यात आली होती परंतु शासन वीज बिलाच्या मुद्दयावर पूर्णपणे उदासिन दिसत असल्यामुळे आम आदमी पार्टी तर्फे चिमूर व नागभीड येथील वीज कार्यालयांना दि. १० सप्टेंबर २०२० ला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टी चे अनेक स्वयंसेवक वीज माफीच्या घोषणा देत विद्यूत भवनाला ताला ठोकत असतांना पोलिसांच्या मह्यास्तीने उग्र आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात आले.

या आंदोलनात- कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी स्वतः करावी, MSEB कडून दि १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावीत, आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा, वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेवून मागील वर्षीच्या याच कालावधीत जे वीज देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत अश्या मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता सुरेशजी कोल्हे, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, विशाल इंदोरकर, सुशांत इंदोरकर, कैलास भोयर, मंगेश वांढरे, त्रिलोक बघमारे, नरेश बुटके, विलास दिघोरे, प्रकाश पाटील, आनंदराव टेंभुरने, भार्गव सोनेकर, निलेश साटोने, विशाल बारस्कर, सुरज तुपट, शिगाल पाटील, संजय बहादुरे, विशाल बारस्कर, लीलाधार लिचडे, देवानंद गायधनी, अरवींद समर्थ, संतोष इखार, मोरेश्वर बाम्बोडे, समिधा भैसारे, सविता हजारे, संगीता तर्वेकर, दीपाली खाटिक, आशा भाजीपाले, सारिका खाटिक,सरिता कळंबे, शोभा कामडी, अर्चना लोहकरे व ईतर स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here