चंद्रपूर जिल्ह्यातील कोमलीका ने पटकावला मिस महाराष्ट्र पुरस्कार…

0
293

चंद्रपूर जिल्ह्यातील कोमलीका ने पटकावला मिस महाराष्ट्र पुरस्कार…

चंद्रपूर | बल्लारपूर येथील कोमलीका जयराज खोब्रागडे हिला दि लीला ऑम्बीयन्स हॉटेल दिल्ली येथे १ ऑक्टोंबर ला पार पडलेल्या मिस अँड मीसेस फ्लायींग फेम इंडीया 2023 स्पर्धे अंतर्गत मिस महाराष्ट्र २०२३ हा पुरस्कार मिळाला.

देशातील सर्व राज्यातील 20 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता हे विशेष! याआधी सुद्धा कोमलीका खोब्रागडे हिने राँची, पुणे, मुंबई, चंद्रपूर, नागपूर येथे झालेल्या अनेक शोज मध्ये प्राविण्य मिळवले आहे. पुणे येथील सिंहगड लॉ कॉलेज मध्ये एल एल बी चे चौथे वर्ष सुरु असुन मॉडलींग या क्षेत्रात किमान 8 वर्षापासून कार्यरत आहे.

चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातून असून सुद्धा कोमल खोब्रागडे हिने दिल्ली सारख्या ठिकाणी पुरस्कार मिळवून चंद्रपूरचे आणि आई वडिलांचे नाव मोठे केले आहे. या यशामुळे कोमलिका चे सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here