बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे धम्म चक्र प्रर्वतन दिनानिमित्त मास्क वाटप
विकास खोब्रागडे

चंद्रपूर । आज 16 ऑक्टोबर 2020 रोजी 65 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे दीक्षा भूमी चंद्रपूर येथे येणाऱ्या धम्म बांधवांना कोरोना संकटापासून संरक्षित राहण्याकरिता मोफत मास्क वाटप कार्यक्रम मध्य चांदा वनविभाग कार्यालयाजवळ मुल रोड, चंद्रपूर येथे घेण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक पिंजारी साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी ,चिचपल्ली रेंज यांनी फीत कापून केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिईएफचे सल्लागार सुभाष मेश्राम उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर जिल्हा बिईएफचे कार्याध्यक्ष सुरेश शंभरकर, प्रास्ताविक रिपब्लिकन मजूर संघटनेचे अध्यक्ष शार्दूल गणवीर तर आभार प्रदर्शन बिईएफ महाराष्ट्र राज्याचे सह सचिव पुरुषोत्तम आवळे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिईएफ चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव नितिन गेडाम, रिपब्लिकन मजूर संघटनेचे सचिव राकेश कालेशवार,पत्रकार मन्साराम राऊत, दिनेश एकवनकर. बिईएफचे कायकर्ते जयपाल मेश्राम सर,सुमेध मूरमाडकर गुरुजी, भास्कर मुन,तसेच समता सैनिक दलाचे मुकेश हुमने इत्यादी पदाधिकाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.