प्रबाेधन विचार मंच तथा युवा मंच व्दारे शालेय साहित्य वाटप ! 

0
530

प्रबाेधन विचार मंच तथा युवा मंच व्दारे शालेय साहित्य वाटप ! 

किरण घाटे

चंद्रपुर:- परिस्थिवर मात करून इंग्रजी शिक्षण मिळविणे ,गाव सोडून शहरात स्थायिक होण्याचा विचार मनात घट्ट करणे व चांगली संगत शाेधुन भविष्याचा वेध घेण्यांस प्रोत्साहित करणे या संकल्पतेतुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुस्क्रूंत घडविण्याचा उपक्रम प्रबंधन विचार मंच व युवा मंच तर्फे नुकताच आरंभ करण्यांत आला आहे .या उपक्रमाचा एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर जवळील दहेली या गावात विद्यार्थ्यांना प्रबोधन विचार युवा मंचच्या युवा संयोजकांनी शैक्षणिक विषयांवर माेलाचे मार्गदर्शन केले.सामाजिक बांधिलकीचे नाते जाेपासत प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे दहेली” या गावातील .होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना शालेय सामुग्री वाटप करण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला.          सदरहु उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना जिवनात यशस्वी हाेण्यांसाठी
विपुल रंगारी, संकेत वेल्हेकर , रितीक खोब्रागडे, प्रणित उराडे , ..आदिंनी माेलाचे मार्गदर्शन केले.
तसेेच उपक्रम यशस्वि करण्यासाठी धनंजय पिंपळे व दशरथ मानकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here