चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मंत्रालय मधील लाच प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

0
406

चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मंत्रालय मधील लाच प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

आप चंद्रपूर महानगर ची मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून मागणी

 

 

 

पंधरा दिवसा आधी चंद्रपूर महानगरपालिका मध्ये आयुक्तांच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने स्वतः वर प्राणघातक हल्ला करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही वार्ता संपूर्ण चंद्रपूर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आयुक्त मोहिते यांच्याकडून संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले तसेच माध्यमांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला होता.

तो संबंधित व्यक्ती मनोरुग्ण नसून त्याचे नाव लक्ष्मण राजेंद्र पवार आहे आणि 14 लाख ची आर्थिक फसवणूक राजेंश मोहिते यांनी केली असल्यामुळे. आपली फसलेली रक्कम त्यांना परत मागण्याकरीता लक्ष्मण पवार यांनी तगादा लावला होता व पैसे परत न केल्यामुळे सदर पीड़ित ने मनपा आयुक्त यांच्या कक्षात स्वता आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला पन पोलिसांनी चोर सोडून सन्यासाला अडकविन्याचा प्रकार केला आहे सदर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करनाऱ्या आयुक्त यांच्या वर कुठलीही कार्यवाही केली नाही व पीड़ित वर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरण गंभीर असून या सम्पूर्ण प्रकारणाची चौकशी करुण सत्य परिस्थिति समोर यावी या करीता जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. या मध्ये आपचे शहर सचिव राजू कुडे यांनी माध्यमां समोर तथा सोशल मीडिया वरती ऑडिओ क्लिप व्हायरल करून जाहीरपणे उघड केले होते.

या संपूर्ण विषयावरती आयुक्त मोहिते आपली चुप्पी सोडतील अशी आशा असताना त्यांनी घटनेला 15 दिवसापेक्षा जास्त काळ जाऊन सुध्दा आपले मत मांडले नाही. राजेश मोहिते हे 2 महिन्यात निवृत्त होत आहे त्याआधी उच्चस्तरीय समिती बसवून तथा एसीबी कडून संबधित विषयाची चौकशी करून दोषिवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपचे शहर सचिव राजू शंकरराव कुडे यांनी केली आहे. यावेळेस आप चे जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार, महिला अध्यक्षा ॲड सुनिता ताई पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष भिवरज सोनी, झोन संयोजक रहमान खान, अजय बाथव, अनुप तेलतुंबडे,. कृष्णा सहारे, जयदेव देवगडे, राजवर्धन बोदेले, जयंत थुल, बाबाराव खडसे, राजेश चेडगुलवार इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here