कोठारी आरोग्य केंद्रात पात्र लोकसंख्येच्या १० टक्के लसीकरण

0
601

कोठारी आरोग्य केंद्रात पात्र लोकसंख्येच्या १० टक्के लसीकरण

ग्रामीण भागात जनजागृतीची आवश्यकता | 

राज जुनघरे

बल्लारपूर  प्रतिनिधी:- 

        तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावांचे १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत करोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास येत असले तरी गाफील राहून चालणार नाही. असे जिल्हा तथा शासन स्तरावरून दिशा निर्देश होत असले तरी ग्रामीण भागात जनजागृतीच्या अभावाने लसीकरणाची टक्केवारी कमी प्रमाणात दिसून येत आहे. कोठारी आरोग्य केंद्रात आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या १० टक्के लसीकरण झाले असून ९० टक्के लसीकरणाची उद्दीष्ट पुरती कायम आहे. लसीकरणा बाबत नागरिकात संभ्रम असल्याने प्रभावीपणे जनजागृती अभियान राबविण्याची नितांत गरज भासु लागली आहे.

     कोठारी आरोग्य केंद्रांतर्गत स्थानिक एक लसीकरण केंद्र व पळजगाव, मानोरा असे दोन उपकेंद्र दिले आहेत. प्राप्त माहितीनुसार कोठारी लसीकरण केंद्रात पात्र ६,८७५ लोकसंख्येच्या तुलनेत एकुण २७ सत्रात १,१७८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पळजगाव उपकेंद्रात पात्र ४,११३ लोकसंख्या, ११ सत्र, ४६१ नागरिकांचे लसीकरण. व मानोरा उपकेंद्रात ५,३२५ लोकसंख्येच्या तुलनेत ८ सत्रात २४५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. एकुण १६,३१३ लोकसंख्येच्या तुलनेत १८८४ पात्र नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. भविष्यात तिसरी करोनाची लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून नागरिकांनी गाफिल राहुन चालणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी लक्षपूर्वक कामगीरी बजावत जनजागृती अभियान राबविण्याची नितांत गरज आहे. राज्य शासनाने करोनामुक्त गाव ही संकल्पना निर्माण केली असून आपल्या निरोगी आरोग्यासाठी संकल्प करण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here