घुग्घुस शहर होणार इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त

0
466

घुग्घुस शहर होणार इलेक्ट्रिक केबलच्या जाळ्यातून मुक्त

देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश

घुग्घुस शहर हे औद्योगिक शहर असुन इथे मोठ्या प्रमाणावर सर्व धर्माचे सण साजरे केल्या जातात. मोठ मोठया मिरवणुका निघतात शहरातील मुख्य मार्गावर स्ट्रीट लाईट व थ्री फेस लाईनच्या केबलचे जुने जाळे आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात जोरदार वादळ वाराधूनीमुळे केबल एकमेकांना लागून वीजपुरवठा खंडित होतो. ही समस्या लक्षात घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरील इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राउंड करणे व शहरातील महत्त्वाचे रस्त्यावरील लाईनचे केबल ए.बी. केबल मध्ये (सिंगल वायर) मध्ये परावर्तित करण्यासाठी पालकमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरवठा केला.

सततच्या पाठपुरव्याला यश आले असून मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार घुग्घूस शहरातील मुख्य मार्गावरील इलेक्ट्रिक लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. तर घुग्घूस गावातील 18 कि.मी. इलेक्ट्रिक लाईनचे रूपांतर इतर सिंगल केबलमध्ये होणार आहे. यात नकोडा गावासोबत इतर 28 इतर गावे सुध्दा समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावात 25 किमी केबल टाकण्यात येणार आहे.

या कामाचे टेंडर झाले असून ठेकेदाराने सर्वे सुद्धा पूर्ण केला आहे व केबल मार्किंग सुद्धा झाले आहे. या कामामुळे घुग्घूस शहर हरित करण्याच्या कार्यालयासुद्धा गती मिळणार आहे. सोबतच घुग्घूस शहरातील मुख्यमार्गाचे सौंदर्यीकरण सुद्धा करण्यात येणार आहे.

या कार्याबद्दल समस्त घुग्गुस् वासियांनी मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले असून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here